Reality of water scarcity in tribal area of ​​Igatpuri taluk esakal
नाशिक

Igatpuri Water Crisis: धरणांचा तालुका कायम तहानलेलाच! महानगरांची तहान भागवणाऱ्या इगतपूरीची व्यथा

सकाळ वृत्तसेवा

Igatpuri Water Crisis : इगतपुरी तालुका महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणुन ओळखला जातो. पावसाळ्यात भरपुर पाऊस पडत असूनही तालुक्यातील गावांसह वाड्या, पाड्यांवर उन्हाळ्यात प्रचंड पाणी टंचाई असते.

दरवर्षी त्याच वाड्या-पाड्यांवर, आदिवासी वस्तीवर पाणी टंचाई निर्माण होते. विशेषत: धरणांचा तालुका अशी ओळख असतानाही पाणी टंचाईचा प्रश्‍न तालुक्यात कायम आहे. (Water Crisis taluka of dams pain of Igatpuri nashik news)

तालुक्यात दारणा, वैतारणा, कडवा, मुकणे, भाम, भाऊली, वाकी ही मोठी, तर वाडीवऱ्हे, खेड, खैरगाव, त्रिंगलवाडी, तळेगाव, कुशेगाव, शिरसाटे हे पाझर तलाव भरुन वाहतात. तरीही तालुक्यातील गावांना, वाड्या-पाड्यांवर प्रचंड पाणी टंचाई असते.

ज्या तालुक्यातील धरणे नाशिक नगर, मराठवाड्याला शेतीसाठी, मुंबई, नाशिक या महानगरांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करतात, त्याच तालुक्यातील आदिवासी बांधवांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते हे दुर्दैव आहे.

पाणी पुरवठा योजना हवी

इगतपुरी तालुक्यातील भुगर्भाची रचना कठीण बेसॉल्ट खडकांची आहे. त्यामुळे पावसाळ्यात जमिनीत पुरेसे पाणी शोषले जात नाही. ऐन उन्हाळ्यात टंचाईच्या काळात जमिनीत पाझर निर्माण होत नसल्याने पाणी उपलब्ध होत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे १ ते ३ की. मी. अंतरावरून दऱ्या-खोऱ्यांतुन, खडकांच्या कपारीतुन, नदीतील बुडक्या, कोरड्या नदीपात्रातील झऱ्यांमधुन डोक्यावर पाणी आणावे लागते. विशेषत: वैतारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या कुरुंगवाडी, खांबळेपैकी शिदवाडी, खैरेवाडी, अवळखेडपैकी कराची वाडी येथे दरवर्षी पाणी टंचाई असते.

येथील महीलांना जिवावर उदार होऊन रोज डोक्यावर पाणी आणावे लागते. तालुक्यातील पाणी टंचाई दुर व्हावी यासाठी शासन पाणी पुरवठा योजना राबवते. मात्र, योजनेला पुरेसा उद्‌भव नसल्याने त्या उन्हाळ्यात बंद पडतात.

पाणी पुरवठा योजना बारमाही चालण्यासाठी थेट धरणातील पाणी उचलावे लागेल. ते एका गावाला परवडणारे नाही. त्यासाठी धरणाचा पाणीसाठा हा उद्‌भव धरुन पाणी उचलून चार ते पाच गावांची सामुदायिक पाणी पुरवठा योजना राबविली पाहिजे. तरच पाणी टंचाईवर कायम स्वरुपी उपाय योजना होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाही प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT