Principal Nagendra Mutkekar, Department Head Satyawan Gaikwad etc. while inspecting the storage pond here which supplies water to the city. esakal
नाशिक

Water Crisis : येवलेकरांना, पाणी जपून वापरा बरं! 5 दिवसाआड पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

Water Crisis : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावातून होणारी पाणी गळती सर्वश्रुत आहे. शिवाय प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवनही वेगाने होत असून याचमुळे मागील आठ-दहा दिवसात तलावातून तलावाची पातळी 0.50 म्हणजेच अर्धा मीटरने खालावली आहे.

वेगाने पाणी आटत असल्याने नगरपालिकेने शहराला तब्बल पाच दिवसाआड म्हणजे सहाव्या दिवशी पाणी देणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे अलि-निनोमुळे पर्जन्यावर होणाऱ्या परिणामाचा फटकाही शहराला बसत आहे. (Water Crisis use water carefully 5 Water supply per day at yeola nashik news)

शहरातील पाणीसाठवण योजनेच्या सुमारे ९० एकराच्या तलावात चार मीटरच्या आसपास पाणी असते. पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून हा तलाव भरला जातो. पालखेड डाव्या कालव्यातून सिंचन व बिगर सिंचन आवर्तन मार्चमध्ये सोडले होते.

२६ मार्चला हे पाणी बंद झाले असून त्यावेळेस सुमारे ६० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा करण्यात आला आहे. त्यावेळी सुमारे पावणेचार मीटरपर्यंत पाणी होते. मात्र महिन्यातच निम्म्याहून अधिक पाणीसाठा घटला आहे.

आजमितीस तळ्यात १.७५ मीटर इतकेच पाणी शिल्लक आहे. आठ- दहा दिवसांपूर्वी सव्वा दोन मीटर पाणी शिल्लक होते, परंतु तलावातून होणारी गळती व आजूबाजूच्या विहिरीतून होणारा उपसा आणि बाष्पीभवनांमुळे तलावाचा पाणीसाठा वेगाने खालावत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासह पालखेड पाटबंधारे विभागाने नगरपालिकेला पत्र देऊन अल-निनो समुद्र प्रवाह सक्रियतेमुळे पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाळ्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याचा संभव असून पाण्याच्या बाष्पीभवनामुळे अधिक व्यय होऊन धरणांसह सर्व साठा वेगाने खालावू शकतो.

या स्थितीचा विचार करता पालखेड कालव्याचे आगामी आवर्तन १० जूननंतर देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे तलावात असलेले पाणी काटकसरीने १५ जूनपर्यंत पुरवा अशा सूचनाच उपकार्यकारी अभियंता राजेंद्र बधान यांनी केल्या आहेत.

यामुळे नगरपालिकेने सावध पवित्रा उचलून सोमवारपासून शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्याने आता आठवड्यातून एकदाच म्हणजे सहाव्या दिवशी पाणी मिळणार असल्याने आतापासूनच टंचाईचे गडद संकट शहरावर निर्माण झाले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मे महिन्यात टंचाईची तीव्रता

टप्पा क्रमांक दोनच्या तलावासह जुन्या गंगासागर तलावातही काही पाणी आहे. ते देखील उपयोगात आणले जाणार असून आज पालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख सत्यवान गायकवाड आदींनी दोन्ही तलावाची पाहणी करून पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना काटकसरीने पाणी देण्याच्या सूचना केल्या.

अजून दीड महिन्याचा कालावधी जाणार असल्याने उपलब्ध पाणी पुरवण्यासाठी पालिकेची कसरत होणार असून नागरिकांना मेमध्ये अजूनच भयावह टंचाईला सामोरे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

"शहराला तीन व चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता.मात्र बाष्पीभवनामुळे पाणीसाठा खालावत आहेच शिवाय जिल्हाधिकारी व पालखेड विभागाकडून १० जून पर्यंत आवर्तन मिळणार नसल्याने उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यामुळे पाच दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.नागरिकांनी अतिशय जपून पाणी वापरावे,पाण्याचा अपव्यय टाळावा म्हणजे उपलब्ध पाणी अधिकाधिक दिवस पुरवता येईल."

- नागेंद्र मूतकेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, येवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT