nashik sakal media
नाशिक

Nashik : रामकुंड, तपोवनातील पाणी होणार स्वच्छ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या मल-जलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर ओझोनायझेशनची प्रक्रिया करून बायोमेडिकल ऑक्सिजन डिमांड दहाच्या आत ठेवण्यासाठी आता नवीन प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी नागपूरच्या ओझोन रिसर्च ॲन्ड ॲप्लिकेशन कंपनीने प्रात्यक्षिके दाखविल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात रामकुंड व तपोवनात प्लांट उभारला जाणार असून, या माध्यमातून भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

शहरातील वापरात आलेले सांडपाणी मलनिस्सारण केंद्रात आणून त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया राबविली जाते. शुद्धीकरणानंतर पुन्हा नदीपात्रात पाणी सोडावे लागते. पूर्वी नदीपात्रात सोडले जाणारे प्रक्रियायुक्त पाण्याची ऑक्सिजन पातळी अर्थात बायोमेडिकल ऑक्सिजन डिमांड तीस होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाबाबत नवीन मानांकने जाहीर केले आहेत. त्यात बायोमेडिकल डिमांड दहाच्या आत असणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेला मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण व क्षमतावाढ करण्याच्या सूचना आहेत. यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.

चेहेडी व पंचक मलनिस्सारण केंद्रांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहेत. रामकुंडासह तपोवन मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रियायुक्त सांडपाण्यावर ओझोनायझेशनची प्रक्रिया केले जाणार असून, त्यासाठी नागपूरच्या ओझोन रिसर्च ॲन्ड ॲप्लिकेशन कंपनीने स्मार्टसिटी कंपनीच्या कार्यालयात प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यानुसार आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित कंपनीला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या. प्रकल्पासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? पुण्यात पाच कोटी सापडल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट व्हायरल

PM Shram Yogi Mandhan Yojana : खुशखबर! मजूरांसाठी मोदी सरकार देणार दरमहा 3000 रुपयांची पेन्शन; असा करा अर्ज

CWG 2026 : भारताला मोठा धक्का! जवळपास २८० पदकं जिंकणारे खेळ २०२६ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळले

कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणारे आपण कोण? कमेंटचा उद्रेक अन् फुकटचा शहाणपणा कधी थांबणार

Vidhansabha Nivadnuk: निवडणुकीचा 'Social' प्रचार! इन्फ्लुएन्सर्स बनले आधुनिक प्रचारदूत; राजकीय रणधुमाळीत कशी करतात कमाई?

SCROLL FOR NEXT