Water leakage on the main road near Soygaon Marathi School esakal
नाशिक

Nashik: महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सोयगावात पाण्याची गळती; 10 महिन्यांपासून दिवसाआड हजारो लिटरचा अपव्यय!

सकाळ वृत्तसेवा

Nashik : शहरातील चर्चगेट-टेहरे चौफुली या मुख्य रस्त्यावर सोयगाव मराठी शाळेजवळ गेल्या दहा महिन्यांपासून पाणी गळती होत आहे.

या भागात पाणीपुरवठा झाल्यानंतर दिवसाआड हजारो लिटर पाण्याच्या अपव्यय होत असून हे पाणी नजीकचे भुखंड व परिसरात जात असल्याने डास, मच्छर व घाणीचेही साम्राज्य वाढले आहे. (Water leakage in Soygaon due to neglect of municipal corporation Waste of thousands of liters every day for 10 months Nashik news)

परिसरातील नागरिकांनी ही पाणीगळती मनपा प्रशासनाच्या वारंवार निदर्शनास आणून दिली. मात्र उपाय योजना शुन्य असल्याने ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या या पाणी गळतीबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरात ठिकठिकाणी सिमेंट रस्त्यांचे काम सुरु आहे. या दरम्यान रस्ता खोदण्यात येतो. त्यावेळी अनेक वेळा नळजोडण्या व काही ठिकाणी जलवाहिन्याही फुटतात. तथापि, त्यांची तातडीने दुरुस्ती होत नाही.

ऐन उन्हाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या या पाणी गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरात पाणी टंचाई जाणवत नसली, तरी तालुक्यातील काही गावांत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना शहरात होणारा पाण्याचा हा अपव्यय चिंताजनक आहे.

मेहुणे (ता. मालेगाव) येथे गेल्या दीड महिन्यापासून ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळालेले नाही. येथील ग्रामस्थांना प्रसंगी पाणी विकत आणावे लागते. टेहरे चौफुली ते चर्चगेट सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे काम सुरु असतानाच येथील जलवाहिनीला बाधा पोचल्याने पाणी गळतीला सुरवात झाली.

त्याचवेळी नागरिकांनी प्रशासनास ही बाब निदर्शनास आणून दिली. निष्काळजीपणासाठी ख्यात असलेल्या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यातुनच गेली दहा महिने सातत्याने पिण्याच्या पाण्याच्या अपव्यय सुरु आहे.

पाणी गळतीमुळे तब्बल १४ कोटी रुपये खर्च करुन साकारलेला रस्ता मराठी शाळेजवळ व मुख्य चौकानजीक निकामी होण्याची शक्यता आहे. त्यातच सिमेंट रस्त्यावरील गळती होणारे हे पाणी मोकळ्या भुखंडावर साठू लागल्याने डासांची संख्या वाढली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

डासांच्या साम्राज्यामुळे साथरोगांना आमंत्रण मिळू शकते, अशी भीती नागरीक व्यक्त करीत आहेत. रस्ता काम सुरु असताना पाणी गळतीवर उपाययोजना केल्या असत्या, तर हा बाका प्रसंग उद्‌भवला नसता.

आता पाणी गळती रोखण्यासाठी येथील नव्याने साकारलेला सिमेंट रस्ता मोठ्या प्रमाणावर खोदावा लागणार आहे. तुर्त हे बालंट नको म्हणून पाणी वाया गेल्यास आम्हाला काय कोणाचे, अशीच भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

समस्यांचे निराकरण व्हावे

महापालिका कार्यक्षेत्रात सध्या छत्रपती शिवाजी महाराज कमान ते उड्डाण पुलापर्यंत जुन्या महामार्गावरील रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण सुरु आहे. या कामातही अनेक नळजोडण्या खंडीत होत आहेत.

त्यातच या रस्त्याच्या पुर्वेला एकाच बाजुला जलवाहिनी आहे. नेमकी रस्त्याच्या पश्‍चिमेला मोतीबाग नाका ते कलेक्टर पट्टा या दरम्यान मोठी नागरी वस्ती आहे. अनेक रहिवाशांनी रस्ता ओलांडून नळजोडण्या घेतलेल्या आहेत.

प्रशासनाने यापुर्वी झालेल्या रस्त्यांच्या कामातील अडचणी, पाणी गळती व अन्य समस्या लक्षात घेऊन या मुख्य रस्त्याच्या कामास त्यांचे निवारण करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT