नाशिक

Nashik Water Scarcity : भर पावसाळ्यातही तहान भागते टँकरवर! येवल्यात टंचाईची साडेसाती

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Scarcity : पावसाळ्याचा दीड महिना उलटला, सर्वत्र पेरणीही मार्गी लागली; पण प्यायलाच पाणी नाही, असे सांगितले तर विशेष वाटेल... मात्र, ही परिस्थिती आहे ती अवर्षणप्रवण येवल्याची...! तालुक्यात अद्यापही धो धो पाऊस नसल्याने सर्व जलस्रोत कोरडेठाक आहेत. यामुळे रोज २६ टँकरने गावे व वाड्यांना मिळून ५४ ठिकाणी पाणीपुरवठा करावा लागत आहे.

मुसळधार पावसाअभावी तालुक्यातील सर्वच बंधारे, नदी हे जलसाठे व विहिरी आदी जलस्रोत अद्यापही कोरडेठाक असल्याने ग्रामीण येवल्याची तहान भरपावसाळ्यातही टँकरवरच भागवली जात आहे.

किंबहुना टंचाईग्रस्त गावात तर दिवस उजाडताच पहिली प्रतीक्षा असते पावसाची आणि दुसरी गावात टँकर पोचण्याची... किंबहुना हे चित्र गेले सहा महिने झाल्यावरही तसेच आहेत. (water scarcity in yeola nashik news)

मागील वर्षी मुसळधार पाऊस होऊनही फेब्रुवारीपासूनच तालुक्यात टंचाईने डोके वर काढले होते. मार्चमध्येच टँकरची मागणी झाली. मात्र जिल्हा प्रशासनाकडून वेळेत मंजुरी न मिळाल्याने ११ एप्रिलपासून तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आजमितीस ३४ गावे व वस्त्या मिळून ५४ ठिकाणी रोज सुमारे ६० खेपांद्वारे १५ खासगी व सात शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्यात ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे ५७ गावे व योजना टँकरमुक्त झाली आहेत तसेच पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना पुरेसे पाणी यंदा मिळत आहे. मात्र वर्षानुवर्षे पाण्यासाठी आसुसलेल्या उत्तर-पूर्व भागाला अद्यापही पिकांना सोडाच पण प्यायलाही पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. एप्रिलपासून तब्बल ५० वर गावे टँकरवरच तहान भागवत आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पालखेडच्या आवर्तनाने शहरासह ३८ गाव योजनेचा साठवण तलाव तुडुंब भरल्याने लाभक्षेत्रातील गावात पाणी मिळत आहे. मात्र याचवेळी टंचाईग्रस्त ५४ गावे व वाड्यांवर टँकर पोचला नाही तरी वणवण सुरू होते. दिवसाआड पावसाची परिस्थिती गंभीर होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेतही वाढ होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तालुक्यातील वाईबोथी, सायगाव फाटा, बाळापूर, पांजरवाडी बोकटे, दुगलगाव, आहेरवाडी, ललित, जायदरे, धामणगाव, खिर्डीसाठे, खरवंडी, देवदरी, सोमठाण जोश, अंदरसूल, नगरसूल येथील वस्त्या, वडाचा मळा, पाटील वस्ती, गाडेकर, घाडगे वस्ती, राजापूर येथील हवालदार वस्ती, धात्रक वस्ती, भैरवनाथ वस्ती, महानुभाव वस्ती, चिचोंडी बुद्रुक, रायते, गुजरखेडे, बल्हेगाव, चिचोंडी खुर्द, कासारखेडे, गोपाळवाडी, वडगाव, कोळम, बदापूर, कोळगाव, ममदापूर, पिंपळखुटे तिसरे, वाघाळे, रहाडी, कौटखेडा, देवठाण, चांदगाव, आडसुरेगाव, भुलेगाव, गोरखनगर, गारखेडा या गावांसह येथील वस्त्यांवरही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

३१ जुलैपर्यंत मुदतवाढ!

तालुक्यात फक्त ५० मिलिमीटर पर्जन्यमान झाल्याने अद्यापही पाण्याची शोधाशोध सुरूच आहे. त्यामुळे सर्वच गावातून टँकरची मागणी सुरूच असून, प्रशासनाने परिस्थिती पाहता कुठेही टँकर बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी ३१ जुलैपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मुदतवाढ देखील दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT