water shortage esakal
नाशिक

Water Shortage : येवल्यात २४ तास पाणीपुरवठ्या दिवास्वप्नच! 6 दिवसाआड पाणी पुन्हा चर्चेत

सकाळ वृत्तसेवा

Water Shortage : सध्या शहराला सहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असून नागरिकांची प्रचंड हाल सुरु आहेत. या पार्श्‍वभूमिवर येथील डॉ. संकेत माणिकराव शिंदे यांनी सोशल पत्रातून लक्ष वेधले आहे.

शहरासाठी युतीच्या शासनकाळात (१९९६-२००१) आई उषाताई शिंदे नगराध्यक्ष असताना टप्पा क्रमांक २ चा तलाव निर्मिती झाली, त्यानंतर शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोणते ठळक काम झाले असेल तर कुणी सांगावे असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

२४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी २००८-०९ मध्ये काम देण्यात आले, त्याचे बिलही अदा झाले पण कुठे आहेत मीटर आणि योजना असा प्रश्‍न केल्याने पाणीप्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. (Water Shortage 24 hours water supply become dream supplying After 6 days at yeola nashik news)

शहराच्या पाणीप्रश्नाकडे ‘शहर पाणी समस्या आणि पाणीप्रश्नी अनभिज्ञ असलेली येवलेकर जनता’ या शीर्षकाखाली त्यांनी मांडलेले मुद्दे व उपस्थित केलेले प्रश्‍न शहरात चर्चचा विषय बनले आहेत.

शहरात सहा दिवसाआड पाणी येत असून माझ्या प्रभागातील महिला पाणी येणार त्यादिवशी पाणी कमी आले किंवा आलेच नाही अशी तक्रार घेऊन येतात, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना विचारले तर किती अड्जेस करणार हे उत्तर मिळते.

शहरीकरण, जुन्या १९ शतकातील सिमेंट पाइपलाइन एक ना अनेक समस्या असूनही त्या सुटत नसल्याने हा प्रश्न गंभीर बनत आहे.

२०१६-१७ मध्ये कॉलनीभागात नवीन पाइपलाइन प्रस्तावित होत्या, पण त्या झाल्याच नसून अनेक ठिकाणी पाईपलाईन नाहीत. जुन्या सिमेंट पाइपलाइन लिकेज आहेत, त्याही अनेक दिवस दुरुस्त होत नाहीत.

जबाबदार कोण? शहारकरिता शेठजीनी जुना तलावासाठी जागा दिली आहे, पण २०१६ पासून करारनामा संपला आहे. तो नूतनीकरण करू शकलो नाही ही खेदाची बाबा आहे.

आज केवळ मार्चमध्ये वर्षातून एकदा जुना तलाव भरला तरी उन्हाळ्यात १ दिवसाआड पाणी देऊ शकतो. जागा किंवा पाणी कमी आहे असे नाही पण इच्छाशक्ती नाही, आपण केवळ विकासाच्या गप्पा मारू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

२०१३ मध्ये पालिकेला स्वच्छ पाणी पुरठ्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. साधारणत २०१७-१८ मध्ये वॉटर फिल्टरमधील वाळू लेयर बदलणे गरजचे होते, पण पालिकेत केवळ चर्चा झाली पुढे काय? कुठून येणार स्वच्छ पाणी? हा गंभीर प्रश्न त्यांनी पुढे आणला आहे.

मागील ३-४ वर्षा पूर्वी कमी दाबाने पाणी येते म्हणून वाढते शहरीकरण विचारात घेता सहा नवीन जलकुंभ प्रस्तावित केले होते, नवीन पाइपलाइनसह काय झाले पुढे? तलावातील पाणी गळती आणि बाष्पीभवन यावर ही मागील काळात काही उपाय सुचवले होते, पण पुढे काहीच झाले नसून हे असेच सुरू राहिले तर भविष्य अवघड आहे.

शहराकरीता येसगाव (कोपरगाव) येथे पालिकेचा तलाव आहे, पण आज आलेल्या अधिकाऱ्यांना हे सुध्दा सांगता येत नाही. गंभीर म्हणजे तीन वर्षापासून शहराला पूर्णवेळ पाणीपुरवठा अधिकारी मिळाला नाही ही तर शहराची शोकांतिका आहे.

तेव्हा येसगाववरून पाणी कधी येणार? नागरिक नियमित पाणीपट्टी भरतात, पण पाटबंधारे विभागाची पालिकेकडे पाणीपुरवठा थकबाकी आहे त्यामुळे पाणी रोटेशन मिळण्यास विलंब होतो, हे कोण सांगणार? असा प्रश्‍नही त्यांनी केला आहे.

शेजारील मनमाडमध्ये नव्याने शहाराकरिता पाइपलाइन काम सुरू आहे. पाणीप्रश्नी नव्यानं काम करण्याची गरज आहे, कुणी एक व्यक्ती हे करू शकणार नाही, हे आपल्यालाच करावे लागणार आहे. शहरातील नागरिकांना आता जागे व्हावे लागणार असल्याचेही डॉ. शिंदे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT