Gangapur dam  Sakal
नाशिक

Nashik Rain Update: नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट टळले! महिन्याभरात गंगापूर धरणात 1 TMC साठा वाढला

जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : महिन्याभरापासून त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे गंगापूर धरणात एक टीएमसी साठा वाढल्याने नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्त टळलेले दिसते.

सद्यःस्थितीला या धरणात २९७८ दशलक्ष घनफूट (५२.९० टक्के) इतके पाणी वापरात येऊ शकते, तरीही नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. (Water shortage crisis averted for Nashik people 1 TMC storage increased in Gangapur Dam during month nashik news)

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. या धरणात (ता. ३० जून) १६४२ दलघफू इतके उपयुक्त पाणी होते. जुलै महिन्यात रिमझिम पाऊस सातत्याने पडत राहिल्याने धरणसाठा २९७८ दलघफूपर्यंत वाढला.

गेल्या चार दिवसांत हे प्रमाण कमालीचे वाढल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. नाशिक जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या २३ धरणांपैकी दारणा धरणातून १९७० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.

या धरणांमध्ये एकूण २३ हजार ६३७ दलघफू इतका उपयुक्त जलसाठा आहे. गेल्या वर्षी २४ जुलैपर्यंत ४० हजार ५१७ इतका उपयुक्त साठा होता. मागील वर्षी नाशिकमधील सर्व धरणांमध्ये ८०.२६ टक्के पाणीसाठा होता.

यंदा ४६.८२ टक्केच पाणी आहे. नाशिककरांच्या दृष्टीने महत्त्वाचे कश्यपी धरणात सद्यःस्थितीला २८.३५ टक्के आणि गौतमी गोदावरीमध्ये २८.४३ टक्के साठा आहे.

‘अल निनो’मुळे जिल्ह्यात कमी पाऊस

जून ते सप्टेंबर २०२३ पर्यंत ‘अल निनो’चा प्रभाव राहणार असल्याने या काळात पाऊस कमी पडेल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, राज्यात सरासरीपेक्षा फक्त दोन टक्के कमी पाऊस पडला. नाशिक जिल्ह्यात १ जूनपासून ७० टक्के पाऊस पडला. साधारणतः ४१३ मिलिमीटरपैकी अवघे २६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा अल निनोचा प्रभाव असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"केवळ नाशिकच नव्हे तर अहमदनगर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण कमी आहे. अरबी समुद्रातून निर्माण होणारे ढग उत्तरेकडे जात असल्याने विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक दिसते. ‘अल निनो’चा प्रभाव डिसेंबरपर्यंत राहणार असला तरी ऑगष्टमध्ये नाशिकसह मराठवाड्यात पाऊस पडेल." - श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ

गंगापूर धरणात गेल्या पाच दिवसांत साठलेले पाणी

तारीख ......... साठा (दलघफू)

२० .... ६९३

२१ .... ७७४

२२ .... ८३८

२३ ..... ९९०

२४ ..... ११४३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT