mhasobawadi esakal
नाशिक

म्हसोबावाडी अद्यापही तहानलेलीच...एक विदारक चित्र; पाहा PHOTOS

सोमनाथ कोकरे

नाशिक : शहरास तीन धरणांतून (dam water supply) पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असला तरी आजही शहरातील एक भाग असा आहे की तिथं महापालिकेची पाणी पुरवठा (nashik municpal corporation) योजना अद्याप पोहोचलेली नाही. शहर जसं- जसं वाढत चाललं तशी लोकवस्तीही वाढत चालली आहे. मात्र सुविधा लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या पडू लागलेल्या आहेत. (water shortage in mhasobawadi nashik marathi news)

पुढे टँकरही बंद झाला

गेल्या वर्षी सकाळने म्हसोबावाडीचा पाणी प्रश्न मांडलेला होता. बातमी छापून येताच दुसऱ्या दिवशी तत्कालीन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आदेश काढून पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. आणि तेव्हापासून लगेचच टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला होता. त्या ठिकाणी तात्पुरती टाकी मांडण्यात आली होती. तिथून पाणी वितरित केले जात होते. पण आताची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. काही दिवस अशा प्रकारे तेथील नागरिकांना पाणी मिळत होते, मात्र पुढे टँकरही बंद झाला आणि ती टाकी कोरडी ठाक पडू लागली, आणि परत सगळी मजल एकाच हातपंपावर सुरु झाली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दिवसभर आणि रात्रभर हातपंपावर गर्दी होते. सकाळच्या वृत्तानंतर बोरगड जलकुंभ ते म्हसोबावाडी साधारणता दोन किलोमीटर पाईप लाईन टाकूनही झाली आहे. काही तांत्रिक कामे बाकी आहेत. दोन वेळा आलेल्या कोरोणाच्या आपत्तीमुळे त्या कामास दिरंगाई लागली आहे. त्यामुळे पाईपलाईन पूर्ण होवून पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. आणि सध्या टॅंकरचा पाणीपुरवठा ही बंद पडलेला आहे. त्यामुळे सर्वांना एकमेव हातपंप पावरच अवलंबून राहावे लागते. हातपंप दिवस रात्र सुरू असतो. रात्रंदिवस त्याच्यावर गर्दी असते. पाणी न मिळाल्यामुळे भांडणे, मारामाऱ्या या नित्याच्याच झाल्या आहेत. दीड ते दोन हजार लोकवस्ती असलेल्या म्हासोबावांडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

mhasobawadi

कोरोनाचा फैलाव होण्याची मोठी शक्यता

येथील काही नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत, सुमारे वीस ते पंचवीस लोक हे पॉझिटिव्ह आहेत मात्र ते कसलेही निर्बंध न पाळता इतस्तत फिरत असतात. त्यातील काही मुले, पुरुष व महिला हातपंपावर पाणी भरण्यासही येत असतात. हातपंपवर नेहमी गर्दी असते. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची खूप मोठी शक्यता आहे.

बोरगड ते म्हासोबावडी दोन किलोमीटर पाइपलाइन टाकून झाली आहे. किरकोळ कामे बाकी आहेत. महिन्याभरात म्हसोबावडीस पाणी मिळेल. प्रभातनगर येथील जलकुंभ पूर्णत्वास आला आहे. तेथूनही नागरिकांना महिन्यात पाणी मिळेल. म्हासोबावांडील मूलभूत सुविधा रस्ते, पथदीप हे पूर्ण झाले आहेत.- रंजना भानसी, माजी महापौर.

mhasobawadi
mhasobawadi

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT