gangapur dam esakal
नाशिक

Water shortage Preparation: गंगापूर धरणात जॅकवेलपर्यंत चर खोदणार! NMCने मागविल्या निविदा

सकाळ वृत्तसेवा

Water shortage Preparation : गंगापूर धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून धरणाच्या पाण्याची पातळी सहाशे मीटरपर्यंत आली आहे.

जून महिना कोरडा जाऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस न पडल्यास ५९८ मीटरच्या खाली धरणातील पाणी पातळी खाली जाणार असल्याने धरणाच्या मध्य भागातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर (इंटेक वेल) खोदावी लागणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने तयारीचा भाग म्हणून चारी खोदण्यासाठी निविदेच्या माध्यमातून दर मागविले आहेत. (Water shortage Preparation Gangapur Dam will be dug up to Jackwell Tenders invited by NMC nashik news)

शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पाणीपुरवठा होतो. गंगापूर धरणातून जवळपास ५० टक्क्यांहून अधिक शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यास त्याचा परिणाम मोठ्या लोकसंख्येवर होतो.

त्यामुळे गंगापूर धरणातील पाण्याचे नियोजन करणे अत्यावश्यक असते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नाशिक शहरासाठी पाणी आरक्षित करताना गंगापूर धरणातूनच सर्वाधिक पाणी आरक्षित केले जाते. पाण्याचे आरक्षण हे ३१ ऑगस्टपर्यंत असते.

सद्यःस्थितीत २० ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच आरक्षित पाणीसाठा आहे. ३१ ऑगस्टपर्यंत पाऊस न पडल्यास एमआयडीसी व एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पासाठी आरक्षित असलेले पाणी नाशिक महापालिका पिण्यासाठी उचलू शकते.

मात्र आरक्षित पाणी धरणातून उचलायचे झाल्यास धरणाच्या मध्य भागातील पाणी जॅकवेलपर्यंत येणे आवश्यक असते. पाण्याची पातळी खालावत असल्याने जॅकवेलपर्यंत येणारे पाणी आता कमी होत असल्याने त्यासाठी धरणाच्या मध्य भागापर्यंत चर खोदणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून चर खोदण्यासाठी दर मागविण्यात आले आहे. धरणाची पाणी पातळी खालावल्यानंतर ऐनवेळी परवान्यांची प्रक्रिया नको म्हणून त्यापूर्वीच सर्व प्रकारच्या प्रशासकीय मान्यता घेण्याचा भाग म्हणून दर मागविण्यात आले आहे.

धरणातील पातळी खालावली

गंगापूर धरणामध्ये सद्यःस्थितीत ६०४ मीटरपर्यंत पाण्याची पातळी आहे. ५९८ मीटरपर्यंत पाणी आल्यास जॅकवेलपर्यंत पाणी पोचणार नाही. त्यामुळे चर खोदणे आवश्यक आहे.

चर खोदली तरी पाणी प्रवाहित राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे धरणाचे पाणी यांत्रिकी पद्धतीने चारीमध्ये पाणी टाकण्यासाठी यंत्रणा लागणार आहे.

"जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदणे गरजेचे आहे. सध्या धरणाची पातळी ६०४ आहे. ५९८ मीटरपर्यंत पाणी पातळी आल्यास जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी ही व्यवस्था आहे."

- अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT