नाशिक : गंगापूर व मुकणे धरणांमधील पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा (Electric supply) शनिवारी (ता. २१) दिवसभर बंद राहणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठादेखील बंद (Water supply Stop) राहणार आहे. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. (Water supply cut off on Saturday Nashik News)
गंगापूर धरणातून पाणी उपसा करण्यासाठी रॉ वॉटर पंपिंग स्टेशनवर सातपूर व महिंद्रा या एक्स्प्रेस फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. मुकणे धरणातून रॉ वॉटर उचलण्यासाठी पंपिंग स्टेशनला गोंदे येथील रेमंड सबस्टेशन वरून वीजपुरवठा होतो. या दोन्ही केंद्रांवर पावसाळापूर्व कामे करण्यासाठी शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या दरम्यान वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रांकडे जाणारी अशुद्ध पाण्याची मुख्य गुरुत्ववाहिनी गोदावरी नदीच्या उजव्या व डाव्या बाजूला दुरुस्त केली जाणार आहे. सिडको, सातपूर येथील अशुद्ध पाण्याची मुख्य गुरुत्ववाहिनी दुरुस्त केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.