मालेगाव : शहरातील संगमेश्वर व कॅम्प भागातील जलवाहिन्या पंधरा दिवसात तिसऱ्यांदा पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली आहे.
यातच रस्ते कामामुळे जुन्या झालेल्या जलवाहिन्या फुटत असून यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. (Water supply in Sangameshwar area of city disrupted for third time Locals begging for water Nashik News)
शहरातील संगमेश्वर व कॅम्प भागातील जलवाहिन्या जुनाट झाल्या आहेत. सातत्याने जलवाहिनी लिकेज व वॉल्व्ह नादुरुस्त होत असल्याने या भागात पाणीपुरवठा विस्कळित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
सध्या शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने निर्धारित दिवशी पाणीपुरवठा विस्कळित झाल्यास संबंधित विभागातील महिलांची तारांबळ उडते.
गेल्या पंधरा दिवसात गिरणा पंपिंग स्टेशनजवळील दहिवाळ एक्सप्रेस फीडरवरील तांत्रिक कामे व दुरुस्तीसाठी, सायने जलशुद्धीकरण केंद्राजवळील वॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने व मंगळवारी सांडव्या पुलावरील वॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने पंधरा दिवसात सलग तिसऱ्यांदा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.
संगमेश्वर भागातील मोसम पुल पलीकडच्या लोढा भुवन, टिळक नगर, बारा बंगला, वर्धमान नगर, आंबेडकर नगर, एकता नगर, श्रीरामनगर या भागात पहाटे सुरळीत पाणीपुरवठा झाला.
याबरोबरच संगमेश्वर भागातील महात्मा फुले रस्त्या नजीकच्या जुन्या गावात आज पाणीपुरवठ्याची वेळ होती.
मात्र सांडवा पुलाजवळील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने मॉर्निंग स्टार, नवा होळी चौक, अहिरे गल्ली, सावता चौक, सुभाष चौक, जगताप गल्ली, पाटकिनारा, पाटीलवाडा, काकुबाईचा बाग, खलीलशेठ चाळ, आनंदनगर, गायत्री नगर या भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला.
सांडवा पुल वॉल्व्ह दुरुस्तीचे काम तब्बल सहा तासाहून अधिक काळ सुरु होते. वॉल्व्ह दुरुस्तीनंतर सायंकाळी पाचनंतर या भागात टप्प्या टप्प्याने पाणीपुरवठा करण्यात आला.
येथील व्हॉल्व्ह रस्त्याच्या समांतर असल्याने एखादे वाहन अथवा अवजड वस्तू वॉल्व्हच्या खड्ड्याजवळ आदळल्यास हा वॉल्व्ह नादुरुस्त होतो. महात्मा फुले रस्त्यावर मध्यवर्ती भागात असलेल्या या वॉल्व्हमधून सातत्याने पाणी गळतीही सुरु असते.
शहरातील विविध भागातील व्हॉल्व्ह व जलवाहिनी लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. कॅम्प भागातील चर्चपाठीमागील सर्वेश्वर महादेव मंदिर, भगवती कॉलनीसह परिसरात सिमेंट कॉंक्रीटीकरण सुरु असताना जलवाहिनी व परिसरातील रहिवाशांच्या नळजोडण्या तुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
शहरातील विविध भागात सातत्याने असे प्रकार घडत असतात. काही भागातील रहिवासी जाणूनबुजून वॉल्व्ह लिकेज करतात. प्रसंगी अशा भागात बारा तासाहून अधिक काळ पाणीपुरवठा होता.
यामुळे एकाला तुपाशी व काही भाग उपाशी अशी स्थिती निर्माण होते. पाणीपुरवठा विभागाने लिकेज जलवाहिन्या व वॉल्व्ह दुरुस्ती तातडीने केली पाहिजे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.