The final stage of concreting work to enclose the new aqueduct laid on the site of the breached aqueduct in the Lendi river basin. esakal
नाशिक

Nashik News : नांदगावचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार; फुटलेली जलवाहिनी दुरुस्त

शहरासह सतरा गावांचा खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्याचा मार्ग आज सायंकाळी मोकळा झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरासह सतरा गावांचा खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्याचा मार्ग आज सायंकाळी मोकळा झाला.

सध्या लेंडी नदीपात्रात नव्या पुलाचे काम सुरू असून या पुलाच्या कामात ठेकेदाराच्या जेसीबीमुळे चारशे एमएमची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा सोळा ते सतरा दिवसापासून खंडित झाला होता. (Water supply of Nandgaon will be restored nashik news)

पाणी वितरणाची मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाला शेवटी सोळाव्या दिवशी यश आले. फुटलेल्या जलवाहिनीच्या ठिकाणी नव्याने चारशे एमएमची लोखंडी नवी जलवाहिनी अंथरण्याच्या कामात विलंब वाढत जात असल्याने पालिका पाणी पुरवठा विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरुस्ती विभागाकडे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.

प्रत्यक्षात पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून नाशिकस्थित एका एजन्सीला हे काम सोपविण्यात आले होते. या एजन्सीने फुटलेल्या जलवाहिनीकडे गांभीर्याने बघितलेच नसल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे जिल्हा परिषद व पालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या अनास्थेबाबत बोट दाखविले.

कधी वेल्डिंग नाही, कधी दोन पाइप जोडणाऱ्या रिंग नसणे अशा अनेक सबबी सांगत या कामाला विलंब होत गेला. पाइप जोडण्यासाठी नदीपात्रात असलेला गाळाचा उपसा करण्यासाठी लावलेली मोटार नादुरुस्त होणे अथवा खराब होणे अशा अडचणींचा सामना या दरम्यान करावा लागला. याचा परिणाम योजनेच्या आवर्तन व्यवस्थेतील वितरणाच्या वेळापत्रकावर होऊन ग्रामीण भागाचा पंचवीस तर शहराचा महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित झाला होता.

अखेर काँक्रिटीकरण झाले...

दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी मनुष्यबळ मिळत नसल्याने शेवटी शुक्रवार उजेडला. दिवसभर जलवाहिनी भोवती कांक्रीटीकरणासाठीचे काम सुरू होते. रेडिमेड काँक्रिट वापरून फुटलेल्या जागेवर टाकत जलवाहिनीला बंदिस्त करण्याचे काम अखेर पूर्ण झाले. आता कांक्रिटीकरणातील ओलाव्यासाठी सलग चोवीस तास द्यावे लागणार असल्याने शनिवारी रात्री उशिरा पाण्याचा दाब तपासण्यासाठीची चाचणी यशस्वी झाली, कि खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT