water supply stop esakal
नाशिक

Nashik News : 12 दिवसात 157 कुटुंबांचा पाणीपुरवठा खंडित; थकबाकी वसुलीसाठी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या विविध कर विभागाकडे मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर पाणीपट्टी थकबाकीदारांकडून वसुलीसाठी तगादा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून १५७ कुटुंबांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. (Water supply to 157 families cut off in 12 days Action for recovery of arrears Nashik News)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

विविध कर विभागाच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न सुरू झाले आहे. थकीत घरपट्टी वसूल करण्यासाठी जप्ती वॉरंट आदेश बजावण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता पाणीपट्टीची थकबाकी वसुली करण्यासाठी नळजोडणी तोडली जात आहे.

पाणीपट्टीचे ७५ कोटी रुपये उद्दिष्ट या आर्थिक वर्षात देण्यात आले आहे. त्यातील ३५ कोटी रुपये आतापर्यंत वसूल झाले आहे. त्यामुळे नळ जोडण्या तोडण्याचे मोहीम हाती घेण्यात आली आहे. सहा कोटी रुपये वसूल करण्यासाठी ७४७ नळजोडणी धारकांना नोटीस बजावण्यात आली होती.

१२ जानेवारीपर्यंत ५९० थकबाकीदारांनी ९७ लाखांची थकबाकी जमा केली, तर ५५७ थकबाकीदार यांनी नोटिशीला उत्तर न दिल्याने नळ जोडण्या तोडल्या जात आहे. नाशिक पूर्व विभागात १६ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पंचवटी विभागात १०, सिडको विभागात ५२, सातपूर विभागात ६६, तर नाशिक रोड विभागात १३ नळजोडणी तोडण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT