godavari.jpg 
नाशिक

काय सांगू गोदा तुझी कथा...कशी अन् किती सांगणार व्यथा!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (म्हसरूळ) गोदावरीच्या पात्रात मिसळणारे पाणी शुध्द असल्याचे भास निर्माण करण्याचा प्रयत्न मलजल शुध्दीकरण केंद्राकडून होत आहे. ज्या ठिकाणी हे पाणी गोदावरीच्या पात्रात सोडले जाते. तेथे प्रचंड प्रमाणात फेस तयार होत आहे. या फेसाचा तेथील वनस्पतींनाही फटका बसला आहे.

पाणी शुध्द असल्याचे भास निर्माण करण्याचा प्रयत्न

मलजल शुध्दीकरण केंद्रातून बाहेर पडणारे पाणी हे शुध्द असणे गरजेचे आहे. मात्र, तपोवनातील मलजल शुध्दीकरण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रचंड प्रमाणात फेस तयार होतो. या फेसामुळे हे पाणी किती प्रदुषीत आहे याचा अंदाज येतो. गोदापात्रात हे पाणी मिसळण्याअगोदर ज्या ठिकाणी मलजल शुध्दीकरण केंद्रातून बाहेर पडणारे पाणी येते तेथे प्रचंड फेस जमा झालेला दिसतो. या फेसाचा वरचा थर हवेच्या झोतात वर उडतो. आजूबाजूच्या भागातील माती पूर्ण काळी झालेली आहे. येथील वनस्पतींनाही त्याचा फटका बसला आहे. गोदावरीच्या पात्रात हे पाणी सोडण्यात येते त्याठिकाणी या पाण्यावरील फेस वाहत येतो. पात्रातील पाण्यात वाहत येणारा हा फेस तरंगत पुढे जातो. हा फेस नाहिसा करण्यासाठी त्यावर फवारा मारून फेस कमी करण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने येथे तुषार सिंचनाचे दोन संच बसविण्यात आलेले आहे, त्यातून वेगाने पडणारे पाणी तो फेस नाहिसा करते. त्यामुळे गोदावरीच्या पात्रात मिसळणारे पाणी शुध्द असल्याचे भास निर्माण करण्याचा प्रयत्न मलजल शुध्दीकरण केंद्राकडून होत आहे.

या मलजल शुध्दीकरण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या या पाण्याची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासमवेत जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केली. त्यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली. मलजल शुध्दीकरण केंद्रातून बाहेर पडणारे पाणी हे शुध्द आणि निर्मळ असायला पाहिजे. त्याचा फेस व्हायला नको तसेच त्याची दुर्गंधीही सुटायला नको असे त्यांनी मत व्यक्त केले होते. त्यानंतरही येथील पाण्यावरचा फेस कमी झालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test : Rohit Sharma संतापला; न्यूझीलंडच्या फलंदाजांनी मैदान सोडले, भारतीय खेळाडूंचा Umpire सोबत वाद

Like And Subscribe Movie Review: तरुणाई आणि सोशल मीडियाला जोडणारा धागा म्हणजे 'लाईक आणि सबक्राईब'

Jammu And Kashmir: जम्मू आणि काश्मीरला मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा; नायब राज्यपालांची मंजुरी

IND vs NZ 1st Test : Sarfaraz Khan, ऋषभ पंतच्या मेहनतीवर पाणी; टीम इंडियाने गटांगळ्या खाल्ल्या; ५४ धावांत ७ विकेट्स पडल्या

Latest Maharashtra News Updates Live : महिलांच्या माध्यमातून देशात विकास साधायचाय : विजया रहाटकर

SCROLL FOR NEXT