Watermelon 123.jpg 
नाशिक

रावळगावच्या टरबुजाचा दिल्लीत डंका!

कसमादेतील दिलीप जाधव यांचा हिवाळ्यातील नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : कसमादेतील शेतकऱ्यांमधील प्रयोगशीलतेची वेळोवेळी प्रचीती येत असते. निसर्गाशी दोन हात करत बळीराजा फळशेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे राबवीत आहे. रावळगाव (ता. मालेगाव) येथील दिलीप जाधव यांनी हिवाळी टरबुजाचा केलेला प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. जाधव यांचे टरबूज दिल्लीच्या बाजारपेठेत भाव खात आहे. त्यांच्या टरबुजाला २३ रुपये किलोने घाऊक भाव मिळाला आहे. अलीकडच्या काही वर्षांतील हिवाळी टरबुजाला एवढा भाव मिळण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.

डाळिंबाने कसमादेचे नाव सातासमुद्रापार नेले असले, तरी इतर फळपिकेही आघाडीवर आहेत. पेरू, अंजीर, बोर, टरबूज, खरबूज, पपई, संत्री, मोसंबी, आवळा आदी फळपिकेही या भागात मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहेत. पूर्वी टरबूज व खरबुजांचे पीक उन्हाळ्यातच घेतले जायचे. या भागात टरबूज, खरबुजांना मागणी फेब्रुवारी ते मे या कालावधीतच असते. कसमादेत वर्षभर फळपिकांची रेलचेल असते. उन्हाळ्यात टरबूज, खरबुजाचे शेतकरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात. एकाच वेळी माल बाजारात येतो. परिणामी, अनेकदा उत्पादन खर्चही निघत नाही. अर्ली द्राक्षाप्रमाणेच दिलीप जाधव यांनी हिवाळी टरबुजांचा प्रयोग पाच वर्षांपासून सुरू केला आहे. तो कमालीचा यशस्वी झाला.

श्री. जाधव यांनी १५ सप्टेंबरला टरबूज बियांची लागवड केली. २५ नोव्हेंबरला पिकाची काढणी सुरू झाली. अवघ्या ७० दिवसांत दमदार पीक हाती आले. या वर्षी अतिपावसामुळे पिकाला सतत तिसऱ्या दिवशी विद्राव्य खत द्यावे लागत होते. वातावरणातील सततच्या बदलामुळे त्यांना ७० दिवसांत जवळपास १८ ते २० वेळा फवारणी करावी लागली. अतिपावसामुळे पिकाची सेटिंग ४० ते ४५ दिवसांनंतर झाली. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. पाच ते सहा किलो वजनाचे फळ नजरेस भरण्यासारखे आहे. त्यांचे लालबुंद टरबूज दिल्ली येथील मोहम्मद ताहीर या घाऊक व्यापाऱ्याने खरेदी केले आहे. सध्या पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. कसमादेतील तरुण शेतकऱ्यांना जाधव यांचा हिवाळी टरबुजांचा प्रयोग आदर्शवत ठरू शकेल.

हिवाळी टरबुजाचे हमखास उत्पन्न मिळते. मात्र, हे पीक घेताना खूप काळजी घ्यावी लागते. पावसाळ्याच्या अखेरीस लागवड होत असल्याने वातावरणानुसार फवारणी करावी लागते. गेल्या वर्षी कोरोना लॉकडाउन व दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे नुकसान झाले. खर्चही निघाला नव्हता. दिल्ली व उत्तर भारतात लग्नसोहळ्यांमध्ये फळांचा अधिक वापर होत असल्याने दर्जेदार टरबुजाला मागणी आहे. खरिपातील इतर पिकांच्या तुलनेने टरबुजाचे पीक परवडते.

-दिलीप जाधव, टरबूज उत्पादक, रावळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : बेळगावात आज काळा दिन फेरी, मराठी ताकद दाखवण्याचे म. ए. समितीचे आवाहन

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

Panchang 1 November: आजच्या दिवशी देवीला बेसन लाडूचा नैवेद्य दाखवावा

Seat Sharing: MVA मधील जागा वाटपाचा वाद कसा मिटणार? शरद पवारांनी सांगितला प्लॅन 

SCROLL FOR NEXT