adhar card esakal
नाशिक

Nashik News: आम्‍हीच आता विद्यार्थ्यांचे आधार वैध करतो; बैठकीत शिक्षणाधिकारी फुलारींनी झाडले

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्याचे काम सचोटीने केले असून, केवळ तांत्रिक अडचणींमुळे किरकोळ विद्यार्थी राहिले आहेत. परंतु काही शाळांमध्ये प्रक्रिया अपूर्ण असलेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

वारंवार सूचना देऊनही शाळांना गांभीर्य नसेल, तर आता आम्‍हीच शाळांमध्ये ठाण मांडून विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्याची प्रक्रिया पूर्ण करतो, असा पवित्रा घेत शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांना झाडले. (We Validate Students Aadhaar In meeting Education Officer Phulari planted trees Nashik News)

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात महापालिकेच्‍या शिक्षण विभागातर्फे आयोजित आढावा बैठकीप्रसंगी श्री. फुलारी यांनी कान उपटले. याप्रसंगी महापालिका शिक्षण विभागाच्‍या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर, नंदलाल धांडे आदी उपस्‍थित होते.

श्री. फुलारी म्‍हणाले, की इंग्रजी माध्यमाच्‍या शाळांकडे सर्व माहिती उपलब्‍ध असूनही त्‍यांच्‍याकडे टाळाटाळ करणे गंभीर बाब आहे. सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्याची प्रक्रिया प्रलंबित असून, यापैकी सुमारे चार हजार विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावत करावे लागणार आहेत.

त्‍यासाठी विभागाकडून मशिन उपलब्‍ध करून देण्याचा प्रयत्‍न असेल. परंतु उर्वरित अठरा हजार विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्याची प्रक्रिया येत्‍या दोन दिवसांत कुठल्‍याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे.

विद्यार्थी आधार वैध करण्यात असमर्थ असलेल्‍या शाळांनी सांगावे, त्‍याच्‍या शाळेत जाऊन शिक्षण विभागामार्फत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशा कानपिचक्‍या त्‍यांनी काढल्‍या.

तसेच मोठी संख्या असलेल्‍या शाळांमध्ये भेटी देण्यासाठी टीम तयार केली जाणार असून, ही टीम ठाण मांडून आधार वैध प्रक्रिया पूर्णत्‍वास नेईल, अशी भूमिका त्‍यांनी जाहीर केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुख्याध्यापकांनी वाचले समस्‍यांचे पाढे

बैठकीप्रसंगी उपस्‍थित मुख्याध्यापकांनी त्‍यांना जाणवणाऱ्या समस्‍यांचे पाढे वाचले. नावातील त्रूटी, आधार कार्डावरील माहिती अपूर्ण असल्‍याने सरल व युडायस्‍कवरील माहिती अपलोड करण्यात अडचणी येत असल्‍याची तक्रार केली.

विशेषतः परप्रांतीय विद्यार्थ्यांचे आधार वैध करताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्‍याचे सांगण्यात आले. अशा प्रकरणांमध्ये वैयक्‍तिक पातळीवर सहाय्यता करून प्रश्‍न सोडविण्यात येतील, अशी ग्‍वाही श्री.फुलारी यांनी दिली.

मान्‍यता रद्दचा प्रस्‍ताव पाठवू : धनगर

शिक्षण विभागाच्‍या आदेशाला न जुमानणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल. मोठ्या विद्यार्थी संख्येने आधार वैध करण्याचे प्रलंबित असलेल्‍या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावत, शिक्षण विभागात पाचारण केले जाईल.

इतक्‍यावर न थांबता गांभीर्याने काम केले नाही तर अनुदानित शाळांचे वेतन रोखण्यासह अन्‍य स्‍वयंअर्थसाहाय्य, खासगी शाळांच्‍या मान्‍यता रद्द करण्याचे प्रस्‍ताव पाठविण्याची कारवाई केली जाईल, या शब्दात प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी खडसावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT