Weather Forecast : यंदाच्या उन्हाळ्यात ११ मेस नाशिकचा पारा ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचला होता. त्यानंतर मात्र कमाल तापमानात घसरण सुरु झाली असून ५ दिवसांमध्ये पारा ५.२ अंश सेल्सिअसने घसरला.
आज तापमान कमाल ३५.५, तर किमान २३.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्रातर्फे बुधवार (ता. १७) ते रविवारपर्यंत (ता. २१) जिल्ह्यात हवामान उष्ण राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Weather Forecast 5 days of hot weather in district Mercury dropped by 5 degrees in 5 days nashik news)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नाशिकमध्ये दिवसनिहाय नोंदवलेले कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे अंश सेल्सिअसमध्ये असे : १० मे-४०.२-२३.७, ११ मे-४०.७-२४.७, १२ मे-३९.७-२३.४, १३ मे-३८.६-२४, १४ मे-३६.३-२३.७, १५ मे-३६.१-२४.१.
दरम्यान, इगतपुरीच्या केंद्रातर्फे पाच दिवस अंशतः ढगाळ हवामान राहील आणि तापमान कमाल ३७ ते ३९, तर किमान १९ ते २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच वाऱ्याचा वेग तासाला १६ ते २१ किलोमीटर राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.