Air pollution  sakal
नाशिक

Sakal Exclusive: पुणे, मुंबईच्या तुलनेत नाशिकची हवा समाधानकारक! नाशिककरांनो काळजी घ्या...

तुषार महाले

Sakal Exclusive : दिल्लीतील प्रदूषण गंभीर पातळी ओलडतांना दिसत आहे, मुंबई, पुण्याची हवा नोव्हेंबरमध्ये खराब स्थितीत आहे. नाशिकमधील हवामानातील गुणवत्तेचे प्रमाण या महिन्यात समाधानकारक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

शहरात नोव्हेंबरमध्ये सूक्ष्म धुलीकणांची संख्या २१० पर्यंत गेली आहे. दिल्लीत हेच प्रमाण ४४० वर, मुंबई, पुण्यात अडीचशेवर गेले आहे. नाशिकमध्ये हवेचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे आहे. सूक्ष्म धुलिकणांचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

शहरात सुक्ष्म धुलिकणांची संख्या २१० पर्यंत नोव्हेंबर महिन्यात गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरात सुक्ष्म धुलिकणांची संख्या पाच नोव्हेंबरला १९१ पर्यंत नोंदविली गेली. ४ नोव्हेंबरला १९४ पर्यंत संख्या गेली होती. (Weather quality in Nashik is satisfactory compared to Pune Mumbai news)

तीन नोव्हेंबरला २०३ पर्यंत ही संख्या गेली होती. दोन नोव्हेंबरला २१० वर गेली होती. एक नोव्हेंबरला सर्वात कमी १६४ सुक्ष्म धुलिकणांची संख्या नोंदविली गेली. हेच सुक्ष्म धुलिकणांचे प्रमाण पुण्यात १४७ ते अडीचशेपर्यंत आहे. मुंबईत दोनशे ते तीनशे दरम्यान हवेची गुणवत्तेची सरासरी आहे.

असे होते गुणवत्तेचे प्रमाण (आकडेवारी सुक्ष्म धुलीकणांची)

केटीएचएम- हिरावाडी- एमआयडीसी अंबड- पांडवनगरी

६ नोव्हेंबर - २२० ------११२-----------१२७----------------१३०

५ नोव्हेंबर ११९ ------११२ ---------१२५-------------११९

४ नोव्हेंबर ---१३७-------१०९--------१७६----------१३७

३ नोव्हेंबर ----१७६---१३१-------१७६------१७३

२ नोव्हेंबर ----२१० -----१४०----१३९-----१३७

१ नोव्हेंबर ----- १६०----१०९----११७--- १०४

(स्रोत : प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभाग)

वर्षभरात हवेची गुणवत्ता स्वच्‍छ

सुक्ष्म धुलिकणामुळे हवेच्या गुणवत्तेचे परिणाम होत आहे. जानेवारी महिन्यांत केटीएचएम महाविद्यालयाच्या केंद्रावर नऊवेळा मध्यम स्वरूपाची गुणवत्ता नोंदविली गेली आहे.

फेब्रुवारीत पाच, मार्चमध्ये चार, जूनमध्ये एक, जुलैत एक असे प्रमाण नोंदविले गेले आहे. नाशिक शहरात महिन्यातील एक-दोन दिवस वगळता हवेची गुणवत्ता स्वच्‍छ, चांगली-समाधानकारक असल्याचे दिसत आहे. दिवसभरातील ओझोन वायूही ८० च्या जवळपास असल्याचे दिसत आहे.

"नाशिक शहरात वायू प्रदूषण होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. बांधकाम व्यावसायिकांना कामाच्या ठिकाणी पाणी फवारण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची तीव्रतेतून होणारे प्रदूषण मोजण्यात आले आहे. ग्रीन फटाक्यांमुळे हवेची तीव्रता चांगली राहण्यास मदत होणार आहे. नागरिकांमध्येही जनजागृती करण्यात येत आहे." - डॉ. राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ

हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण किती असावे

० ते ५० व ५१ ते १०० - चांगली/समाधानकारक - हिरवा

१०१ ते २०० - मध्यम - पिवळा

२०१ ते ३०० - खराब (आजारी लोकासांठी त्रासदायक) - केशरी

३०१ ते ४०० - अतिखराब (श्वसनाचे आजार होण्याचा धोका) - लाल

४०१ - गंभीर - (निरोगी लोकांना धोका) - तपकिर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सर्व खाजगी मालमत्ता ही भौतिक संसाधने नाहीत, सरकार अधिग्रहण करु शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार? मुंबई इंडियन्सच नव्हे, तर चार तगडे संघ बोली लावणार

Nashik Vidhan Sabha Election: विधानसभेत महायुतीला 175 जागा मिळणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत माहिती

Diwali Weekend Hotel Spike : शहर निघाले हॉटेलिंगला..! चार दिवसांत ३ ते ४ कोटींची उलाढाल, सुट्यांमध्ये गाठणार ९ कोटींचा टप्पा

Heena Gavit : भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा झटका! माजी खासदाराचा पक्षाला रामराम; विधानसभेच्या मैदानात अपक्ष लढणार

SCROLL FOR NEXT