Agriculture news esakal
नाशिक

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अवघ्या 50 तासात खोदली जातेय विहीर

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा (जि. नाशिक) : पारंपारिक पद्धतीने विहीर खोदाईसाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, पोकलेन मशिनच्या (Pokland Machine) मदतीने हेच काम आता दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने या मशीनने दोन दिवसात ३५ ते ७० फुटापर्यंत विहीर खोदाई होत असल्याने या मशिनला पसंती मिळू लागली आहे. कसमादे परिसरात खोदाई करण्यासाठी अशा मशिनरी उपलब्ध झाल्या आहेत.

यामुळे पैसा अन् वेळेचीही बचत

कालौघात नवनवीन तंत्रज्ञानाचा बोलबाला वाढला आहे. ७०- ८० च्या दशकात ४० ते ५० फुट विहीर खोदाई करायची असेल तर बैलांच्या सहाय्याने शिकाळीच्या मदतीने दोन ते तीन वर्षात ही कामे व्हायची. त्यानंतर २० वर्षांपूर्वी मथुरा क्रेन आल्यानंतर हीच कामे दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपली. या क्रेनच्या सहाय्याने शंभर फुटापर्यंतच्या विहिरीसाठी चार महिन्यांचा कालावधी लागत असे. पारंपारिक पद्धतीने विहीर खोदाईसाठी वेळ व पैसाही जास्तीचा लागत असे. मात्र, तंत्रज्ञानाच्या काळात सध्या पोकलेन मशिनच्या मदतीने हेच काम दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. या मशिनच्या मदतीने जास्तीतजास्त खोलीपर्यंत खोदता यावे, अशा ठिकाणीच विहीर खोदली जाते. जमिनीपासून चाळीस फुटापर्यंत विहीर खोदली जाते. त्यानंतर विहिरीसोबतच मशीनला उभे रहाण्यासाठी देखील जागा करून मशीन जमिनीपासून चाळीस फुट खोलीला जाऊन विहिरीची खोदाई करते. विहीर करताना काढलेला मलबा लगेचच काठावरून ट्रॅक्टर, तसेच ट्रकच्या सहाय्याने बाहेर नेला जातो. त्यामुळे याठिकाणी ढीग होत नसल्याने लगेचच विहिरीशेजारी मोकळी जागा होते.

मशिनरीला मागणी वाढली

मुरमाड खडक, मातीचा थर, नरम खडक, मुरुमयुक्त माती असल्यास शेतकऱ्यांचा अधिक फायदा होतो. खडक पक्का असेल तर फायर उडवून काम करावे लागते. एका फुटास अडीच हजार रुपये मजुरी असल्याने व मजुरी कमी लागत असल्याने अवघ्या ५० तासात विहीर खोदाई होत असल्याने या मशिनरीला मागणी वाढू लागली आहे. ७० फुटापर्यंत खोदाईसाठी पाऊने दोन लाखाचा खर्च आहे. तर पारंपारिक पद्धतीने क्रेनच्या मदतीने चार ते पाच लाख रुपये खोदाईला लागत असतात. वेळ देखील जास्तीचा जात असल्याने सध्या या मशिनरीच्या मदतीने विहीर खोदाई मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे.

''पारंपारिक पद्धतीने विहीर खोदण्यासाठी अधिकचा कालावधी लागतो. मात्र, या मशिनरीने कमी कालावधीत विहीर खोदण्याचे काम होत असल्याने आमच्याकडे प्रतीक्षेत शेतकऱ्यांना रहावे लागत आहे.'' - पन्ना शेठ, राजस्थानी कारागिरी, सटाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT