Nashik News : येथील घाऊक बाजारात शहाळ्यांची (ओले नारळ) आवक घटली आहे. घाऊक बाजारात नारळाने चाळिशी ओलांडली आहे. किरकोळ बाजारात ५० रुपये प्रती नगाप्रमाणे नारळाची विक्री होते.
कर्नाटकातून येणाऱ्या नारळांची आवक घटल्याचा परिणाम भाववाढीवर झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. (Wet coconut becomes expensive in Malegaon Resulting from decrease in income 50 rupees piece in retail market Nashik News)
उन्हाळ्यात नारळाला मागणी वाढते. कोकण पाठोपाठ कर्नाटकातील नारळ मालेगाव परिसरात विक्रीसाठी येतात. देशात नारळाचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटकातून घेतले जाते. उन्हाळ्यात सर्वत्र नारळाचे उत्पादन घटते.
याचा फटका भाववाढीवर होत आहे. मालेगावात ४० रुपयावरुन ५० रुपयावर नारळाचा भाव गेला आहे. नाशिकला ६० तर मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, इंदूर, अहमदाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये नारळ ८० रुपये नगाप्रमाणे विक्री होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मालेगावात १०५ हातगाड्यांवर नारळाची विक्री होते. फक्त मालेगावात आठवड्यात ७५ टन नारळांची विक्री होत असून मालेगावकर जवळपास तीनशे टन नारळाचे पाणी महिन्यात फस्त करतात. नारळ महाग झाल्याने गल्ली-मोहल्ल्यात विक्री करणाऱ्या काही हातगाड्या बंद झाल्या आहेत.
शहरातील लहान मोठ्या रुग्णालयासमोरच नारळाची विक्री होते. भाव कमी झाल्यास विक्री चारशे टनापर्यंत जाते. फेब्रुवारी महिन्यापासून नारळाचे दर वाढले आहेत. जुलै महिन्यात नारळाची आवक अजून घटण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली असून किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हिवाळ्यात नारळांची आवक वाढल्याने बाजारात रेलचेल असते. त्यामुळे नारळाचे भाव स्थिर राहतात. ३० रुपये नगाप्रमाणे मिळणाऱ्या नारळाने किरकोळ बाजारात पन्नाशी ओलांडली आहे.
कर्नाटक येथील म्हैसूर, बंगलोर यासह विविध भागातील नारळ येथे विक्रीसाठी येतो. कसमादेतील व्यावसायिक शहरातून माल विक्रीसाठी घेऊन जातात. नारळ पाणी पिल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. नारळ पाण्यात पोटॅशियम, कॅल्शिअम, ॲन्टीऑक्सिडन्ट तसेच अमिनो ॲसिड यासह आदी घटक असल्याचे व्यापारी हाजी जावीद शेख यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
"शहरात नारळ विक्रीचा व्यवसाय शेकडो नागरिक वर्षानुवर्षे करीत आहेत. नारळ महाग झाल्याने ग्राहक कमी झाले आहेत. येथे दोन महिन्यापूर्वी पन्नास रुपयाला दोन नारळ मिळत होते. भाव दुप्पटीने वाढल्याने विक्रीत घट झाली आहे."
- शेख रईस, नारळ विक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.