what food should we eat during shravan month nashik news esakal
नाशिक

Shravan Fasting Tips : श्रावणात उपवास करताय? मग जाणून घ्या काय खावे काय नाही... अशी घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा

Shravan Fasting Tips : श्रावणात वातावरण अल्हाददायक असले तरी आरोग्यासाठी विशेष काळजी घेण्याचा महिना आहे. आपल्याकडे पूर्वीपासून श्रावणात उपवास केले जातात.

उपवास करणे शरीरासाठी योग्य आहे, पण बदललेल्या जीवनशैलीत उपवासही चुकीच्या पद्धतीने केले जात असल्यामुळे ते अपायकारक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपवासात हलक्या पदार्थांचा समावेश करावा, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. (what food should we eat during shravan month nashik news)

आवश्यक तेवढेच खावे

उपवासाला शरीराला आवश्यक तेवढेच खावे, सकाळी उठल्यावर गरम पाण्याचे सेवन करावे. जिरे, हिंग, धने, आले यांचा आहारात समावेश करावा. ताकात आले, ओव्याची पूड, चिमूटभर हिंग व काळे मीठ टाकून प्यावे. ड्रायफ्रुट, बदाम, अक्रोड, खजूरातून प्रोटीन चांगले मिळते.

मखान्याची खीर पीठ करून त्याचे सेवन करावे. दूध, दुधाचे पदार्थांत कायब्रोहायड्रेट मिळते. राजगिरा थालिपीठ करून मिरचीचा ठेचा, दहीचे सेवन केल्यास कॅल्शिअम मिळते. लिंबू सरबताचा आहारात समावेश करावा.

आहारात टाळावे तळलेले पदार्थ

साबुदाणा, साबुदाणा वडे, तळलेले पदार्थ खायचे. या सगळ्या गोष्टी केल्यास उपवास करणे साध्यच होत नाही. पोटाला आराम मिळत नाही. श्रावणामध्ये उपवास करताना हायड्रेटेट राहणे फार आवश्यक आहे. मधुमेही असल्यास साबुदाणा, बटाटा, रताळे खाण्याऐवजी भगर, ताक, फळांचा आहारात समावेश करावा. मधुमेह असलेल्यांनी शक्यतो उपवास करणे टाळावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्रावणात अशी घ्यावी काळजी

दररोज किमान नाश्ता करून दोन वेळेस जेवण करतो, त्यामुळे पोटाला आराम मिळणे आवश्यक असल्याने पचनशक्तीसाठी उपवास चांगला असतो. परंतु त्याचे पालन करताना योग्य पद्धतीने केले पाहिजे. फळांचा आहारात समावेश करावा. मात्र मिक्स फळांचे सेवन करणे टाळावे. त्यामुळे पोषण घटक मिळत नाही. गुणधर्म वेगळे असल्याने एकच फळ घ्यावे, उपवासाच्या दिवसांत प्रोटीन मिळणे आवश्यक असते. भरपूर पाणी प्यावे. साठ टक्के पोट भरेल एवढेच अन्न घ्यावे.

"श्रावणात उपवास करताना रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होणार नाही, याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उपवास करताना पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण पाडणारे तळलेले पदार्थ, साबुदाणा, साखरेचे पदार्थ आहारातून बाद करावे. दिवसाचा आहार चार भागात विभागणे आवश्यक असून भगर, ताक, राजगिरा यांचा समावेश असावा. शरीरास अठराशे ते दोन हजार कॅलरीज व ५० ग्रॅम प्रथिने घ्यावे."- डॉ. सुप्रिया गोसावी, आहारतज्ज्ञ

"रोजच्या आहारात बदल व्हावा. उपवासाच्या पदार्थांमध्ये जे घटक मिळतात ते शरीराला मिळण्यासाठी उपवासात भगर, ताक, फळांचा समावेश करावा. साबुदाणा, तळलेले पदार्थ टाळावे. श्रावणामध्ये उपवास करताना हायड्रेटेट राहणे फार आवश्यक आहे. लिंबू सरबताचा आहारात समावेश करावा. फळांचे गुणधर्म वेगळे असल्याने मिक्स फळांचा आहारात समावेश करू नये. ड्रायफ्रुट, बदाम, अक्रोड, खजुराचे सेवन करावे." - रंजिता शर्मा, आहारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT