पल्लवी कुलकर्णी : सकाळ वृत्तसेवा
Adhik Maas 2023 : अधिक मासात जावई, गायी, देवता, गंगेला वाण देणे, अधिक माहात्म्य वाचणे, मातेची पूजा करून तिची ओटी भरणे, ३३ मेहुणांचे भोजन, विष्णू याग असं सर्व १८ जुलैपासून सुरू झालंय.
ते १५ ऑगस्टपर्यंत चालेल. तसेच अधिक मासातील तिथींना केलेल्या दानाचे विशेष महत्त्व आहे. (what is importance of charity in adhik maas nashik news)
सध्याच्या अधिक मासातील दशमी, एकादशी, द्वादशी, पौर्णिमा या विशेष तिथींना दान देण्याचं अधिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे पंचपर्व म्हणजेच वैधृती योग, व्यतिपात योग, अमावास्या, पौर्णिमा, द्वादशी तिथी ही पंचपर्व... यास दानाचे महत्त्व असते.
दान देताना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, बर्फी, सप्तधान्य दिली जातात. अनारसे, बत्तासे यांसारख्या पदार्थांचे ३३ नग याप्रमाणात दान दिले जाते. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान आदींचा दानात समावेश होतो. तसेच इच्छाशक्ती व आर्थिकता याप्रमाणे दान केले जाते.
३३ दानाचे महत्त्व
तेहतीस कोटी देवता ही भावना समाजामध्ये रूढ आहे. त्याआधारे प्रकार म्हणून दानाला स्थान दिले गेले. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. वायू, जल, आकाश, वनस्पती आपल्या जगण्याचा अर्थ प्राप्त करून देतात. त्यानिमित्त देवतांचे पूजन करण्याची समाजभावना आहे. तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात ३३ दानाला महत्त्व आहे. सच्छिद्र स्वरूपात अनारसे, बत्तासेंचा समावेश केला जातो. अनंत कोटी देवता म्हणून सच्छिद्र अनारसे. त्यावरील छिद्रे मोजता येत नाहीत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अधिक मासाचे माहात्म्य
स्वयम्भुवे नमस्तुभ्यं ब्रह्मणेऽमिततेजसे। नमोस्तुते श्रीयानन्त दयां कुरु ममोपरि ॥
या संस्कृत श्लोकाचा अर्थ म्हणजे, आपण सारे अधिक मासात दान, धर्म, जप- तप करत असतो.
विद्यादान अनंत काळाचे
अन्नदानंम्, धनदानम्, विद्यादानम् ततःपरम् ।
अन्नेन क्षणिका तृप्तिर्यावज्जीवं च विद्यया ॥
या संस्कृत श्लोकाचा अर्थ म्हणजे, अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. तसेच धनदान, विद्यादान यांना महत्त्व आहे. अन्नदानाने भूक भागून तृत्पी मिळते. मात्र विद्यादान हे अनंत काळापर्यंत तृप्ती देत असते.
"यंदा अधिक-श्रावण मासाचा दुग्धशर्करा योग आहे. त्यामुळे विष्णुयाग, तसेच रुद्रांचे आवर्तन, महारुद्र स्वाहाकार अशा अनेक पूजनाने व दानाने पुण्याचा संचय मिळविता येते. तसेच मनाला व सभोवतालच्या वातावरणातील प्रसन्नता वाढत जाऊन जगाच्या कल्याणासाठी हवन केले जाते." - विद्याताई दुगल (पुरोहित)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.