Drama  esakal
नाशिक

Nashik News: नाशिक रोड नाट्यगृह कामाला मुहूर्त कधी? घोषणा हवेत विरल्याची कलावंत, रसिकांची भावना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक रोडच्या कलावंत व रसिकांची गेल्या वीस वर्षांपासूनची नवीन नाट्यगृहाची मागणी प्रलंबितच आहे. महापालिकेने नाशिक रोडला ७२० खुर्च्यांचे आधुनिक असे नाट्यगृह मंजूर केले आहे. परंतु, नाट्यगृहाच्या कामाला अद्याप मुहूर्त लाभलेला नाही.

श्रेयवादाची लढाई आणि प्रशासकीय उदासीनता याला कारणीभूत असल्याचा रंगकर्मींचा आरोप आहे. लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना अजून यश मिळत नसल्याचे रंगकर्मी आणि रसिकांचे म्हणणे आहे. (When Nashik Road theater ready for work feeling of artists fans that announcement in air News)

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे नाशिक शाखाध्यक्ष रवींद्र कदम आणि प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दादा भुसे तसेच नाट्य परिषदेचे मुख्य अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले यांना पत्र लिहून नाशिक रोडचे नाट्यगृह त्वरित उभारण्याची मागणी केली होती. मात्र याला प्रशासकीय गतिमानता नाही.

त्यामुळे नाट्यगृहाचे कुदळ मारल्याशिवाय नाट्यगृहाचे काम सुरू झाले असे म्हणता येणार नसल्याचे रंगकर्मींचे म्हणणे आहे. नाशिक रोडला बिटको चौकाजवळील मोठ्या भूखंडावर कोठारी नाट्यगृह होणार आहे.

सुरवातीला त्याची क्षमता ४२० एवढीच होती. परिषदेच्या पाठपुराव्यामुळे ही क्षमता ७२० झाली आहे. हिरावाडीतील भोरे नाट्यगृहासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, त्याच्या पाच वर्षे आधी मंजुरी होऊनही नाशिक रोडच्या नाट्यगृहाचे काम सुरू झालेले नाही.

नाशिक रोडला धनंजय वाबळे, रमाकांत वाघमारे, हरीश परदेशी, प्राजक्त देशमुख, रूपाली देशपांडे, अहमद शेख, राजेश भुसारे आदी दर्जेदार कलावंत आहेत. म्हणून कलावंतांची भूक आणि रसिकांची मेजवानी साधण्यासाठी लवकरच या नाट्यगृहाला कुदळ मारावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

"जोपर्यंत नाट्यगृहाचे प्रत्यक्षात काम सुरू होत नाही, तोपर्यंत ही घोषणा हवेत विरली असल्याचे आम्ही समजतो. नाट्यगृह कामाची कुदळ लवकर मारला पाहिजे. त्यामुळे कलाकारांची सांस्कृतिक भूक आणि रसिकांना मिळणारे मेजवानी हा दुग्धशर्करा योग साधता येईल. नाशिक रोड आणि पंचक्रोशीतील कलाकारांना नाशिकला जावे लागते, त्यामुळे वेळ, पैसा वाया जातो."

- रमाकांत वाघमारे, ज्येष्ठ नाटककार, नाशिक रोड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

138 crore gold seized In Pune: पुण्यात सापडले घबाड! निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांनी जप्त केले 138 कोटींचे सोने; 'तो' टेम्पो कोणाचा?

Rajan Salvi : 'मविआचे 188 उमेदवार विजयी होतील, त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री आणि मी मंत्री होईन'

IPL 2025 Retention : काव्या मारनची एक 'खेळी' अन् Rishabh Pant, KL Rahul, Shreyas Iyer सह बंडाला पेटली 'मंडळी'!

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs NZ: नशीबानं संधी मिळाली अन् Mitchell Santner ने ७ विकेट्स घेत सोनं केलं; भारताविरुद्ध मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

SCROLL FOR NEXT