The staff of The Gateway Hotel Nashik and M/s Om Vibhuti Arts undertook a voluntary initiative under 25 Mess 'CSR' to transform the walls of Padsad School. esakal
नाशिक

Social Work News : जेव्हा भिंती शिकवतात अन्‌ मुले शिकतात

प्रशांत कोतकर : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आपण सगळे ज्या समाजामध्ये कार्य करतो त्या समाजाला परत देणे, हा आयएचसीएलच्या सीएसआर आणि शाश्वततेसाठीच्या दृष्टिकोनाचा केंद्रबिंदू आहे. ‘द गेटवे हॉटेल नाशिक’ने अलीकडेच एक फ्रेमवर्क पाठ्य जाहीर केले आहे.

जे सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेते. ज्याचा विस्तार समाजापर्यंत होतो. द गेटवे हॉटेल नाशिक ‘पाठ्य’ बांधिलकीचा भाग म्हणून वेळोवेळी लोककल्याणासाठी सक्रियपणे प्रयत्न करते.

या वेळी लक्ष केंद्रित करण्याचे क्षेत्र म्हणजे मुलांचे शिक्षण. विशेषतः कर्णबधिर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड विकसित करणे. द गेटवे हॉटेल नाशिकचे कर्मचारी आणि मेसर्स ओम विभूती आर्ट्स यांनी पडसाद शाळेच्या भिंतींचा कायापालट करण्यासाठी २५ मेस ‘सीएसआर’अंतर्गत स्वयंसेवी उपक्रम राबविला. (When walls teach and children learn Gateway Hotel Nashik has created magic in classrooms Nashik News )

‘द गेटवे हॉटेल नाशिक’ने केली वर्गखोल्यांमध्ये जादू

पडसाद कर्णबधिर विद्यालया (कर्णबधिर मुले जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातून आहेत)ची स्थापना १९९१ मध्ये करण्यात आली. शाळेच्या संस्थापिका तथा मुख्याध्यापिका सुचेता सौंदणकर अशा मुलांसाठी शिक्षणाचे काम पुढे चालविण्यास नेहमीच उत्साही आणि कार्यरत असतात. कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी पसंतीची शिक्षण शैली व्हिज्युअल-लर्निंग आहे, यात आश्चर्य नाही. व्हिज्युअल लर्निंग ही एक पद्धत आहे.

ज्याद्वारे विद्यार्थी माहिती पाहून त्यावर प्रक्रिया करतो. व्हिज्युअलच्या रूपात चार्ट, नकाशे, ग्राफिक्स, प्रतिमा आणि व्हिडिओंच्या स्वरूपात सादर केलेली माहिती लक्षात ठेवण्यास चांगले असतात.

हे लक्षात घेऊन वर्गखोल्यांना दृष्यदृष्ट्या आकर्षक बनवून, तसेच मजेशीर उपक्रमांद्वारे त्यांना संकल्पना शिकण्यास मदत करून, वर्गाच्या भिंतींना नवीन रूप देऊन पुनरुज्जीवित करण्याची सुचेता सौंदणकर यांचे स्वप्न होते. द गेटवे हॉटेलने ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वयंसेवा केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

साध्या भिंतींचे आता शिकण्याच्या भिंतींमध्ये रूपांतर झाले.

मेसर्स ओम विभूती आर्ट्सच्या सहकार्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पडसादच्या आठ वर्गखोल्यांचा हा परिवर्तनीय प्रवास केला. वर्गाच्या भिंती आता पुन्हा रंगविण्यात आल्या आहेत. साध्या भिंतींचे आता शिकण्याच्या भिंतींमध्ये रूपांतर झाले आहे.

या वेळी भूमिती आणि अंकगणितापासून इंग्रजी शब्दसंग्रह शिकण्यापर्यंत आणि पृथ्वीच्या वातावरणाबद्दलच्या संकल्पनांचे चित्रण केले आहे. ५ ते १२ वयोगटांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मनोरंजक आणि शैक्षणिक थीम दर्शवितात.

या व्हिज्युअल अॅक्टिव्हिटी त्यांना विचार करण्यास, विश्लेषण करण्यास आणि विद्यार्थ्यांमधील समस्या सोडविण्याच्या कौशल्यांना प्रोत्साहन देतील. या संपूर्ण प्रयत्नाचे पडसाद कर्णबधिर विद्यालयाच्या टीमने कौतुक केले. जूनमध्ये जेव्हा विद्यार्थी शाळेत परत येतील तेव्हा त्यांच्यासाठी हे एक मोठे आश्चर्य असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार? म्हणते, "महाराष्ट्रावर प्रेम नसतं तर..."

SCROLL FOR NEXT