Construction of new water tank at Adarsh ​​Chowk, Nampur. esakal
नाशिक

Nashik: ग्रामीण पेयजल योजनेचे पाणी नागरिकांना कधी मिळणार; खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी लक्ष घालण्याची मागणी

प्रशांत बैरागी

नामपूर : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत सुमारे ३४ कोटींच्या नामपूरसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे काम चार वर्षांपासून सुरू असले तरी नागरिकांना पाणी कधी मिळणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी याकामी लक्ष घालून संबंधित ठेकेदारांना तातडीने काम पूर्ण करण्याची तंबी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (When will citizens get water under rural drinking water scheme MP Dr Subhash Bhamre demands attention Nashik)

नामपूर शहरासह परिसरातील गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी २०१९ मध्ये माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून पाणी योजनेस मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.

नामपूरसह आसखेडा, जायखेड़ा, नळकस व सारदे या पाच गावांना योजनेचा लाभ होईल. या योजनेंतर्गत हरणबारी धरणातून थेट पाइपलाइनद्वारा शहरासाठी तसेच सहभागी गावांसाठी मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. परंतु चार वर्षांचा कालावधी लोटल्यावरही अद्याप कोणत्याही गावात पाणी पोचलेले नाही.

यंदा पावसाने मोसम खोऱ्यात पाठ फिरवल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन हिवाळ्यात विहिरींना तळ गाठला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात काय परिस्थिती राहील, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

नव्या वर्षापर्यंत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यास दुष्काळाची झळ कमी होईल. काही वर्षांपासून मोसम नदीपात्रातून होणारा बेसुमार वाळू उपसा, भूजल पातळीत झालेली घट यामुळे उन्हाळ्यात दर वर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

मोसम नदीकाठावरील विहिरी आटल्याने शहराला तब्बल १२ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकारांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात पाण्यासाठी दाही दिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर आली होती.

युवानेते डॉ. दिकपाल गिरासे यांच्या पुढाकारातून मायलन अमेरिकन कंपनीच्या सीएसआर फुंडातून मोसम नदीपात्रात कोल्हापूर टाईप बंधारा बांधल्यानंतर टंचाईची धग कमी झाली आहे.

नामपूर मोसम खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शहराचा झपाट्याने विकास होत असून, सुविधांच्या उपलब्धतेमुळे परिसरात अनेक नववसाहती उदयास आल्या आहेत.

शहराची लोकसंख्या पस्तीस हजार इतकी आहे. आजही शहराला सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जुन्याच पाणीपुरवठा योजनेचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु हरणबारी धरणाचे आवर्तन संपल्यावर पुन्हा पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसते.

ग्रामपंचायतीची सर्वेक्षणासाठी तीन लाख खर्च

नामपूर शहराचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी हरणबारी धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणी आणण्यासाठी ग्रामपंचायतीने सर्वेक्षणासाठी तीन लाख खर्चही केले आहेत.

शासनाचे कार्यसन अधिकारी अधिकराव बुधे यांनी पाणीयोजनेस ३३ कोटी ८२ लाखांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार पाणी वाहतुकीसाठी परिसरात पाइप बुजण्यात आले असून, नामपूरला जुनी पाण्याची टाकी पाडून नवीन टाकी बांधण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT