While giving a statement to Tehsildar Siddharth More, Nilesh Chavan, Vishal Vadghule, Parashuram Shinde, Devidas Devare, Nivrithi Khalkar etc. esakal
नाशिक

NAFED Onion Purchase: नाफेडचे खरेदी केंद्र आहे कुठे? शेतकरी संघटनेचा प्रशासनाला प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

NAFED Onion Purchase : तालुक्यात बाजार समितीच्या आवारात नाफेडने अजूनही खरेदी केंद्र सुरु केले नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा कुठे घेऊन न्यायचा याबाबत खुलासा झाला नाही तर तालुक्यातील शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा शेतकरी संघटनेचे तालुक्यातील नेते नीलेश चव्हाण यांनी दिला. (Where purchase center of NAFED Farmers association question to administration nashik)

येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वारापुढे आज रास्तारोको आंदोलन करण्यात येणार होते, मात्र आंदोलनाऐवजी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले.

तहसीलदार मोरे यांनी नाफेडचे खरेदी केंद्र सुरु झाल्याची माहिती निवेदन देण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांना दिली, मात्र नाफेडचे केंद्र सुरु झाले असेल तर नेमके कुठे सुरू झाले आहे असा प्रश्न या आंदोलकांना पडला.

नाफेडच्या संबंधित अधिकाऱ्यांनी खरेदीचे रिपोर्टींग तहसीलदारांना केले असल्याने नीलेश चव्हाण यांच्यासह अन्य उपस्थितीत शेतकरी संघटनाचे कार्यकर्ते पदाधिकारी आश्चर्यचकित झाले.

बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांच्याकडे नाफेडचे खरेदी केंद्र सुरु झाल्याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी असे कुठलेही केंद्र सुरु झाले नसून नाफेडच्या यंत्रणेपैकी कुणीही बाजार समितीला सायंकाळपर्यंत काहीही कळविलेले नाही अशी माहिती दिली.

चार ट्रॅक्टर कांद्याची नाफेडने खरेदी केली असेल तर खरेदी कुठल्या जागेवर केली? बंद दाराआड केला का? नाफेडने तालुक्यासाठी कुठला प्रतिनिधी नियुक्त केला आहे त्यांनी केंद्र सुरु झाल्याची माहिती का दडविली असे नाना प्रश्न मात्र यानिमित्ताने उपस्थितीत झाले.

नाफेड खरेदीची आकडेवारी देत असली तरी या केंद्रांबाबत कांदा उत्पादक अनभिज्ञ असल्याच्या या प्रकारामुळे शेतकरी संघटनेचे नीलेश चव्हाण यांनी नापसंती दर्शविली. शेतकऱ्यांना माहिती नसतील तर ते कांदा कसा नेणार याचा खुलासा झाला पाहिजे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांचे व नाफेडचे नेमके कुठले साटेलोटे आहेत हेही स्पष्ट होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

निवेदनावर नीलेश चव्हाण विशाल वडघुले, परशुराम शिंदे, देविदास देवरे, निवृत्ती खालकर, ज्ञानेश्वर निकम, भिकनराव पवार, सुनील देसले, नंदू पवार, उत्तम मेंधे, बाबासाहेब शेळके, अशोक फणसे, पंकज घोटेकर, संदीप शेळके, राकेश चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

नांदगावात दुष्काळ जाहीर करावा

कांदा खरेदी केंद्रांच्या ठिकाणांची स्पष्टता कशामुळे लपविली जाते हे कळण्यासाठी बाजार समितीच्या आवारात नाफेडने सोमवारी खरेदी सुरु करावी अन्यथा नाफेड विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे.

दरम्यान पावसाअभावी शेतकरी संकटात आहेत, आधीच नुकसान झालेले असून तालुक्यात दुष्काळ घोषित करावा, शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विम्याचे पैसे शंभर टक्के मिळून द्यावे व चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, सरकारतर्फे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही शेतकरी संघटनेसह, आम आदमी पार्टीने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT