A meeting of administrative officers, board office bearers held in East Divisional Office regarding Ganeshotsav esakal
नाशिक

Nashik News : सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताय, वाहतूक शाखेचे हमीपत्र घेतलेय का?

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : पूर्व विभागीय कार्यालयात शुक्रवारी (ता.८) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तसेच विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली.

गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या. विशेष करून गणेशोत्सव मंडप उभारताना वाहतूक शाखेचे हमीपत्र असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव अध्यक्षस्थानी होते. महापालिकेच्या एनएमसी फेस्टिव्हल वेबसाइटवर परवानगीसाठीचा अर्ज कसा करायचा, याचा नमुना देण्यात आला आहे. (While setting up Ganeshotsav Mandap necessary to have letter of guarantee from Transport Department nashik news)

मंडळाचे पदाधिकारी ऑनलाइन अर्ज करू शकतील. पूर्व विभागाकडे आतापर्यंत ३५ मंडळांनी अर्ज आले आहे. त्यातील १० ते १५ अर्ज परवानगीसाठी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली.

मंडळ अध्यक्षांचे आधार कार्ड, वाहतूक शाखेचे हमीपत्र, महापालिकेची परवानगी दर्शनी भागात लावणे, अनिवार्य असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय अग्निप्रतिबंधक उपाययोजना करणे. वाळूच्या बादल्या, पाण्याचा ड्रम भरून ठेवणे यासह अग्निशामक प्रतिबंधक सिलिंडर मंडळाच्या मंडपात असणे आवश्यक आहे.

तसेच अग्निप्रतिबंधक संदर्भातील जनजागृतीचे फलक लावण्यात यावे. धर्मदाय आयुक्त कार्यालयाची तात्पुरती परवानगी घ्यावी, अशा सूचना विभागीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. सूचनांचे वाचन जाहिरात व परवाने विभागाचे अधिकारी झुबेर सय्यद यांनी केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पूर्व विभागाचे अधीक्षक चंदन घुगे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राकेश हांडे, पोलिस मुख्यालयाच्या उपनिरीक्षक सुवर्णा महाजन, इंदिरानगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक वाल्मीक चौधरी, भद्रकाली ठाण्याचे हवालदार राजू जाधव, ललित केदारे, अग्निशामक विभागाचे किशोर पाटील, घनकचरा विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महसूल पथकाची विशेष नजर

जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाचे पथक तयार करण्यात आले आहे. त्यांच्याकडून गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांची तपासणी करण्यात येणार आहे. मंडपाच्या दर्शनी भागात महापालिकेची परवानगी लावणे आवश्यक आहे. पथकास परवानगी दिसली नाही तर मंडळास अनधिकृत ठरवण्यात येऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT