कोरोना मुळे शासकीय व निमशासकीय संस्थांचे परवानग्या मिळण्यात अडथळे येत असल्याने सीएनजी पंपांचा प्रवास लांबणीवर पडतं असल्याचे दिसतं आहे.
नाशिक : पेट्रोलचे दर शंभरी पार पोहोचले तर डिझेलचे दर शंभरी गाठतं असताना परवडणाऱ्या वाहतुकीसाठी वाहनधारकांचा कल नॅचरल कॉम्पॅक्ट गॅस (सीएनजी) (CNG) कडे असताना शहरात अवघे तीन पंप (Petrol pumps) सुरु आहे. त्यामुळे या पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून येत्या वर्षा अखेर पर्यंत शहरात बारा पंप सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोना मुळे शासकीय व निमशासकीय संस्थांचे परवानग्या मिळण्यात अडथळे येत असल्याने सीएनजी पंपांचा प्रवास लांबणीवर पडतं असल्याचे दिसतं आहे. (while the trend of vehicle owners in nashik is towards CNG only three Petrol pumps are operational in the city)
नाशिक शहरात पायाभुत सुविधांचे जाळे वेगाने विस्तारतं आहे. समृध्दी महामार्ग, सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड, ओझर विमानतळावरून सुरु झालेली प्रवासी हवाई वाहतुक, प्रस्तावित टायर बेस मेट्रो, महापालिकेच्या वतीने येत्या चार-पाच दिवसात सुरु होणारी शहर बससेवा आदी सुविधांमुळे शहर विकासाचा टॉप गिअर पडला आहे. परंतू पायाभुत सुविधांचा विकास होत असताना इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. पेट्रोल शंभरी पार गेले तर डिझेल दरवाढीची वाटचाल देखील त्याच दिशेने सुरु आहे. त्यामुळे परवडणारे इंधन म्हणून सीएनजी चा पर्याय वाहनधारकांनी स्विकारला आहे. मात्र शहरात सीएनजी इंधन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने सध्या सुरु असलेल्या पंपांवर वाहनांचा एक ते दोन किलोमीटरच्या रांगा लागल्याने शहरात सीएनजी पंप वाढविण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
बारा पंप प्रस्तावित
सीएनजी इंधन सध्या साठ रुपये किलो या भावाने मिळतं असल्याने स्वस्तातील हे इंधन वापरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. शहरात अजून बारा पंप प्रस्तावित असून वर्षा अखेर पर्यंत पंप सुरु होतील, अशी माहिती सुत्रांनी दिली. शहर व जिल्हा मिळून ३२ सीएनजी पंपांना मंजुरी देण्यात आली आहे. परंतू कोरोनामुळे शासकीय परवानगी मिळण्यात अडचणी निर्माण होत आहे.
टायटल क्लिअर प्लॉटची अडचण
सीएनजी पंप सुरु करण्यासाठी टायटल क्लिअर प्लॉटची आवशक्यता भासते. शहरी भागात पंप टाकायचा असेल तर महापालिका, पोलिस आयुक्त व अग्निशमन दलाची परवानगी लागते. महामार्गावर पंप टाकायचा झाल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तर ग्रामिण भागात जिल्हाधिकारी, तहसिलदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना हरकत दाखला, नगररचना विभाग, पोलिस अधिक्षक कार्यालयाचा ना हरकत दाखला, केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेसो ची गरजेचा आहे. परंतू कोरोनामुळे शासकीय कार्यालयांमध्ये २५ टक्के उपस्थिती असल्याने परवानगी मिळण्यास विलंब झाल्याचा दावा केला जात आहे.
शहरात सुरु असलेले सीएनजी पंप
- पाथर्डी, जेलरोड, बिटको.
ग्रामिण मध्ये सुरु असलेले पंप
- सिन्नर, ईगतपुरी, पळसे, ढकांबे, चांदोरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.