Widespread action by rural police against illegal businesses nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : ग्रामीण पोलिसांची अवैध व्यवसायांविरोधी व्यापक स्वरूपात कारवाई

जिल्हयातील पोलिस ठाणेनिहाय अवैध व्यवसायांविरोधात दोन दिवसात व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

ओझर : नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील पोलिस ठाणेनिहाय अवैध व्यवसायांविरोधात दोन दिवसात व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात आली. (Widespread action by rural police against illegal businesses nashik crime news)

सदर कारवाईत नाशिक ग्रामीण व मालेगाव विभागातील पोलिस ठाणे हद्दीत अवैध गावठी हातभट्टीची दारू बनविणारी ठिकाणे, त्यामध्ये डोंगर, दऱ्या, नदी, नाले अशा अतिदुर्गम ठिकाणांवर पायपीट करून, त्यांचा शोध घेवून छापे टाकण्यात आले आहे.

तसेच अवैधरित्या गावठी दारू, देशी विदेशी मद्याची वाहतूक करणारे वाहने, तसेच विक्रीच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. तसेच अवैधरित्या अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या आणि अवैधरित्या मटका व जुगार चालविणारे व खेळणारे इसमांवर कारवाई देखील कारवाई करण्यात आली आहे.

बुधवारी अवैध व्यवसायांविरोधी केलेली कारवाई

1.मुंबई दारूबंदी कायदा 49 केस

2.महाराष्ट्र जुगार 02 केस

3.कायदा NDPS - 01 केस

4.एकूण 52 केसेस 54 आरोपी

जिल्हयातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलिसांना कळवावी असे आवाहन पोलिस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde And Ajit Pawar: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन! अजित पवार बारामती तर एकनाथ शिंदे 'या' मतदारसंघातून भरणार अर्ज

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री पोलिसांचा गोळीबार, २ जण जखमी; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Manoj Jarange Patil: राज्य भाजप 'फडणवीस' यांच्यामुळे संपणार

Sambhajiraje Chhatrapati: मी कोल्हापुरातून लढणार नाही

Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंडित, दाते

SCROLL FOR NEXT