नाशिक

Nashik Crime News : मुलाच्या मदतीने पत्नीने केला नवऱ्याचा खून; दारूच्या व्यसनाला कंटाळून केले कृत्य

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : न्यायडोंगरी येथे पत्नीने मुलाच्या सहाय्याने पतीचा खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी पत्नी व मुलाला अटक केली असून मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. (Wife killed husband with help of her son nashik crime )

मन सुन्न करणाऱ्या या घटनेबाबत माहिती अशी, येथील वृंदावननगर येथे राहणारा संजय गणेश गायकवाड (३७) हा रात्री नेहमीच दारू पिऊन घरात पत्नी व मुलांना मारहाण करीत असे.

गुरुवारी (ता.५) रात्री अकराच्या सुमाराला संजय दारू पिऊन आला व त्याने पत्नी मुलाला मारहाण केली. सततच्या मारहाण व त्रासाला कंटाळलेल्या पत्नी उषा हिने दारूच्या नशेत असलेल्या संजयच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली.

मुलगा अविनाश याने नायलॉन दोरीने गळफास लावून संजयचा खून केला. संजयची आई मीराबाई हिने आपल्या मुलाची हत्या झाल्याची फिर्याद पोलिसात दाखल केल्याने पोलिसांनी मायलेकाला अटक केली.

उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, नांदगाव पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज वाघमारे तपास करीत आहेत. दरम्यान मृत संजय गायकवाड यांच्यावर न्यायडोंगरी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT