Congress MP Imran Pratapgarhi esakal
नाशिक

Congress News: ‘इंडिया’ नाव हटविण्यासाठी नोटबंदी कराल का? काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांचा भाजपला सवाल

सकाळ वृत्तसेवा

Congress News : भारत व इंडिया या नावावरून देशात राजकारण पेटलेले असताना इंडिया हे नाव हटविण्यासाठी आता नोटबंदी कराल का, असा प्रश्न उपस्थित करीत अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगढी यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. इंडिया आणि भारत हे एकच आहेत.

त्यासाठी कुठे-कुठे नावांमध्ये बदल कराल, आधारकार्ड, इस्रो, आयआयटी आणि नोटांवरील इंडिया नाव हटवाल का, असा थेट प्रश्न पंतप्रधानांना विचारत खासदार प्रतापगढी यांनी भाजपच्या नेत्यांवर चौफेर टीकास्त्र सोडले. (Will you demonetize to remove name India Congress MP Imran Pratapgarhi question to BJP nashik)

नाशिक जिल्हा व शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे जुन्या नाशिकमधील चौकमंडई येथे जनसंवाद यात्रा बुधवारी (ता. ६) घेण्यात आली. या वेळी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रतापगढी बोलत होते.

ते म्हणाले, की देशाचे पंतप्रधान मणिपूर या विषयावर एक शब्दही बोलत नाहीत. २३ दिवसांच्या संसदीय कामकाजात ते फक्त दोन दिवस उपस्थित राहिले.

देशात महागाई, बेरोजगारी यांसारखे प्रश्न उभे राहिलेले असताना भाजपचे नेते फक्त धर्मात तेढ निर्माण करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मात्र, त्यांच्या विरोधात इंडिया आघाडी उभी राहिल्यावर भाजपच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्यामुळे या नावावरून आता देशभरात काहूर माजविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

इंडिया या नावाला विरोध करून कुठल्या-कुठल्या गोष्टी बदलणार आहेत, याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा, अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली.

पंतप्रधान मोदी यांनी विकलेला चहा कोणीही पिलेला नाही, तर त्यांचा क्लासमेट आजही सापडलेला नाही, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली.

या देशात काँग्रेस हाच एकमेव सक्षम पर्याय असून, नागरिकांनी त्याला साथ देण्याचे आवाहन प्रतापगढी यांनी आपल्या भाषणात केले. देशात लोकशाही व राज्यघटना शिल्लक राहील की नाही, अशी परिस्थिती या देशाची झाली आहे.

‘इस्रो’ने चांद्रयान तीन ही मोहीम यशस्वी केली; परंतु त्याचा पाया १९६२ मध्ये पंडित नेहरू यांनी रचला होता. शास्त्रज्ञांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे; परंतु केवळ श्रेय घेण्याचे काम भाजपने करू नये, असा टोला माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

दुष्काळाच्या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मागणाऱ्या मराठा समाजाच्या बांधवांवर लाठीहल्ला करून या सरकारने आपला निर्लज्जपणा दाखवून दिल्याची टीका थोरात यांनी या वेळी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, सचिव राहुल दिवे, राजीव वाघमारे, आमदार वजात मिर्झा, हनिफ बशीर यांनीही आपले मनोगत मांडले.

या वेळी आमदार हिरामण खोसकर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, अहमद खान, डॉ. जफर खान, स्वाती जाधव, वत्सला खैरे, ज्ञानेश्वर काळे, स्वप्नील पाटील, इम्रान पठाण यांच्यासह जुन्या नाशिक भागातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयास ४० लाख

कोरोना काळात गॅस गळती झालेल्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयास अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी आमदार वजात मिर्झा यांनी १५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

तसेच, खासदार इम्रान प्रतापगढी यांनी २५ लाख रुपये खासदार निधी देण्याची घोषणा आपल्या भाषणात केली. येत्या १२ तारखेला दिल्लीत पोहोचताच या निधीचे पत्र तत्काळ जारी केले जाईल, असे आश्वासन खासदार प्रतापगढी यांनी आपल्या भाषणात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT