सिन्नर : शहरात थंडी वाढल्याने लहान मुलांमध्ये सर्दी- खोकल्याचे प्रमाण वाढले आहे.
सर्दी-खोकल्यापासून मुलांच्या संरक्षणासाठी उबदार कपडे, स्वच्छता आणि भरपूर पाणी पिण्यासाठी द्यावे, ही त्रिसूत्री असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञांनी दिली. (Winter Child Care Dress Warmly Stay Clean Drink Wate Doctors advice on taking care of children in winter nashik)
हिवाळ्यात तापमानात घट झाल्यामुळे मुलांना सर्दी, खोकला आणि चोंदलेले आणि वाहणारे नाक, श्वसनमार्गाच्या संसर्गाची शक्यता असते. मुले थंडीपासून संरक्षित कशी राहतील, याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्ला बालरोग तज्ज्ञ डॉ. आनंद नागरे यांनी दिला.
हिवाळ्यात उबदार राहणे गरजेचे आहे. सर्दी होण्याची अधिक शक्यता असते, त्यांना उबदार कपडे घाला. मुलांसाठी बूट, मोजे, टोपी आणि हातमोजे यांसारख्या वस्तू वापरायला विसरू नका.
यामुळे थंडीपासून बचाव करता येईल. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मुलांना संतुलित, पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. लहान मुलांना थंड हवामानात भूक लागत नाही. त्यांना निरोगी ठेवण्यासाठी नियमित पौष्टिक आहार द्या.
मूल पौष्टिक आहार घेत असल्याची खात्री करा. सर्दी आणि फ्लूसारख्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी मुलांना साबणाने आणि पाण्याने वारंवार हात धुण्यास प्रोत्साहन द्या.
मुलांना आवश्यक फ्लू लस मिळाल्याची खात्री करा आणि लसीकरण चुकवू नका. शिंकताना, तसेच खोकताना त्यांना तोंडासमोर रूमाल धरायला सांगा. थंड हवामानात अनेकदा तहान लागत नाही.
त्यामुळे बद्धकोष्ठता आणि डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात. हे टाळण्यासाठी मुलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण चांगले ठेवणे महत्त्वाचे आहे. हळदीचे कोमट दूध प्यायला द्यावे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते, असे डॉ. नागरे यांनी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसापासून थंडीचे प्रमाण वाढल्याने उबदार कपड्यांची बाजारपेठ तेजीत आली आहे. स्वेटर, मफलर अशा विविध प्रकारचे उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.