Women shopping for sweaters. esakal
नाशिक

Winter Shopping : थंडी वाढताच उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : गेल्या काही दिवसापासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. थंडीत वाढ होताच नाशिककरांकडून उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. स्वेटर, मफलर अशा विविध प्रकारचे उबदार कपडे घेण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. परतीच्या पावसाने शहरवासीयांना चांगलेच झोडपून गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिली. त्यानंतर मात्र रात्री थंडीचा तडाखा जाणवू लागला आहे. त्यानिमित्ताने नागरिकांची शालिमार परिसरात स्वेटरसह अन्य विविध प्रकारच्या उबदार कपडे घेण्यासाठी गर्दी उसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. (Winter Shopping Rush to buy warm clothes as cold increases Nashik Latest Marathi News)

अनेकांकडून घरात असलेले उबदार कपडे परिधान करून थंडीपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अन्य नागरिकांची शालिमार भागात स्वेटर, जॅकेट कानटोपी, हातमोजे, पायमोजे, लहान मुले, महिलांचे स्वेटर अशा विविध प्रकारच्या खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. तीनशे रुपयापासून तर एक हजार रुपयापर्यंत विविध प्रकारचे रंगबिरंगी, डिझाईनचे आकर्षक स्वेटर विक्रीसाठी आहे.

पुरुषांकडून जॅकेटला अधिक पसंती मिळत आहे. तर महिलांचे स्वेटर अधिक प्रमाणात खरेदी- विक्री होताना दिसले. शरणपूर रोड येथील तिबेटियन मार्केटमध्येदेखील अशीच गर्दी दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्यांनी उबदार कपड्यांच्या दरांमध्ये वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. भाऊबीजनंतर खरेदीसाठी नागरिकांची होणारी गर्दी उबदार कपडे खरेदी-विक्रीसाठी पोषक ठरत आहे.

असे आहे दर (महिलांसाठी)

स्वेटर प्रकार दर

व्हाइट कॉलर ३५० ते ४००

लाँग बेल्ट फॅन्सी स्वेटर ४५० ते ५००

शॉर्ट ३०० ते ३५०

स्पॉट वेलवेट ५०० ते ५५०

पारंपरिक लोकर स्वेटर २०० ते २५०

लेडीज जॅकेट ३०० ते ३५०

पुरुषांसाठी

व्ही गळा असलेले स्वेटर ३००

जॅकेट ३५० ते ४००

लेझर जॅकेट ६०० ते १ हजार

होडी जॅकेट ४००

सीव्हलेस स्वेटर २५० ते ३००

साधे स्वेटर १५०

लहान मुलांचे स्वेटर १५० ते २५०

उडन टोपी ३० ते २००

हात मोजे ४० ते १५०

लहान मुलांची टोपी ३० ते १००

पायातील मोजे २० ते ४०

मफलर १० ते १५०

"गेल्या काही दिवसांपासून शहरात रात्री जाणवणाऱ्या थंडीने हुडहुडी भरत आहे. अशीही थंडी स्वेटर आणि उबदार कपडे विक्रीसाठी सुगीची ठरत आहे. यंदा आत्तापासून उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी उसळल्याने येत्या काही दिवसात १०० टक्के खरेदी-विक्री होण्याची शक्यता आहे." - मोहसीन शेख विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT