The reflection of the fort and surrounding hills in the water of Tringalwadi Dam at dawn. esakal
नाशिक

Winter Tourism : त्रिंगलवाडी किल्ला ठरतोय हिवाळी पर्यटनाचे आकर्षण!

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुका आणि निसर्ग सौंदर्य यांचे अतुट असे नाते आहे. त्यामुळे कोणताही ऋतु असला, तरी या भागात पर्यटकांची कायम रिघ असते. त्यातच तालुक्याला एक ऐतिहासिक वारसासुद्धा आहे. त्यापैकीच छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला त्रिंगलवाडी किल्ला हा सध्या हिवाळी पर्यटनासाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या त्रिंगलवाडी धरणात पहाटेच्या शांत वातावारणात किल्ल्याचे व आसपासच्या डोंगरांचे प्रतिबिंब बघावयास मिळत असल्याने या भागात येणाऱ्या व जाणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत असल्याची अनुभती येत असल्याचे पर्यटक सांगतात. (Winter Tourist Place Tringalwadi Fort becoming attraction of winter tourism nashik news)

असा आहे त्रिंगलवाडी किल्ला

समुद्र सपाटीपासुन ३ हजार २३८ फूट उंचीचा त्रिंगलवाडी किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. कळसूबाई डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा समजला जातो. इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्‍चिमेकडे पसरली आहे.

याच रांगेत त्रिंगलवाडी, बळवंतगड आणि कावनई हे किल्ले आहेत. या मार्गात लागणारी गावं, डोंगर माथ्यापर्यंत आलेले रस्ते, माणसांची वर्दळ यामुळे येथील भटकंती कमी कष्टाची मानली जाते.

किल्ल्याचा इतिहास

किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १० व्या शतकात झाली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही, मात्र १६८८ च्या अखेरीस मुगलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. किल्ल्यावर त्रिंगलवाडी गावातून जावे लागते.

पायथ्याशी पांडवलेणी नावाची गुहा आहे. या लेणी ३ भागात आहेत. ओसरी, आत विहार आणि विहारात कोरलेले कोनाडे, प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम आढळते. विहाराच्या आत कोनाड्यात गौतम बुद्धाची ध्यानस्थ मुर्ती व खाली एक शिलालेख आहे. विहाराच्या ४ खांबांपैकी ३ खांबाची पडझड झाली आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

येथून किल्ल्यावर जाताना पायऱ्यांच्या अगोदर गुहा लागते. गडावर पोचल्यावर समोरच पडक्या वाड्याचे अवशेष व पुढे पिण्याच्या पाण्याचे भुयारी टाके लागते. टाक्याच्या खांबांवर सुंदर नक्षीकाम आढळते. तेथून पुढे गेल्यावर शंकराचे मंदिर लागते. येथील कड्यावरून दक्षिणेस तळेगड, इगतपुरी, पूर्वेला कळसूबाई, उत्तरेला त्र्यंबक रांग, हरिहर, बसगड असा परिसर दिसतो. पायऱ्यांच्या समोरच वाड्याचे अवशेष आहेत.

ही वाट गडाच्या गुप्त दरवाजापाशी घेऊन जाते. पायऱ्यांनी खाली उतरल्यावर आपण अखंड कातळात कोरलेल्या दरवाजापाशी पोचतो. दरवाजाच्या उजवीकडे ६-७ फूट उंच हनुमानाची मूर्ती कोरली आहे. समोरच कातळात कोरलेल्या पायऱ्या किल्ल्याच्या मधल्या पठारावर घेऊन फिरण्यास साधारण १ तास लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT