Crime esakal
नाशिक

Nashik Extortion: स्वामी समर्थ गुरुपीठाच्या विश्वस्तांना केले ब्लॅकमेल; महिला कृषी अधिकाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाच्या विश्वस्तांना आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी ‘ब्लॅकमेलिंग’ करून दहा लाखांची खंडणी घेताना महिला कृषी अधिकाऱ्यासह तिच्या मुलास अटक करण्यात आली आहे.

गंगापूर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित मायलेकांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संशयित महिलेने २०१५ पासून आतापर्यंत एक कोटींची रक्कम तक्रारदार विश्वस्तांकडून उकळली आहे. (Woman Agriculture Officer Arrested In Extortion Case trustees of Swami Samarth Gurupeetha blackmailed nashik Crime)

सारिका बापूराव सोनवणे (वय ४२, रा. सिडको, मूळ रा. देवळा, जि. नाशिक) असे संशयित महिला कृषी अधिकाऱ्याचे व मोहित बापूराव सोनवणे (२५) असे मुलाचे नाव आहे.

दोघांना गंगापूर पोलिसांनी शनिवारी (ता. १८) मध्यरात्री जेहान सर्कल येथे दहा लाखांच्या खंडणीची रक्कम घेताना अटक केली.

गुरुपीठाचे विश्वस्त निंबा मोतीराम शिरसाट (रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, २०१४-१५ मध्ये संशयित सेवेकरी असलेली सारिका सोनवणे ही स्वामी समर्थ केंद्राच्या प्रमुख व्यक्तींसह विश्वस्त शिरसाट यांच्या संपर्कात आली.

तिच्यावर सिडको परिसरातील स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविली. नंतर कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा परिसरातील ४५ समर्थ केंद्रांची जबाबदारी दिली.

सारिका हिच्या पतीचे २०१८-१९ मध्ये निधन झाले. त्यामुळे तिने विविध कारणे सांगून शिरसाट यांच्याकडून २५ लाख रुपये उसनवार घेतले. याच कालावधीत सारिकाने संकल्प सिद्धी नावाची कंपनी ‘पैसे डबल’ करून देईल, असे सांगून सेवेकऱ्यांकडून पैसे जमा केले; परंतु ते परत केले नाहीत.

त्यामुळे शिरसाट यांनी सारिकाला पुन्हा २० लाख रुपयांची मदत केली. जानेवारीत सारिका व मोहितने पैसे न दिल्यास तुमचे आक्षेपार्ह व्हिडिओ करून ते व्हायरल करू,’ अशी धमकी देत जादा पैसे मागितले. तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

त्यामुळे शिरसाट यांनी तत्काळ ५० लाख रुपये दिले; परंतु संशयित सारिका हिने काही दिवसांपूर्वी शिरसाट यांच्याकडे पुन्हा साडेदहा कोटींच्या खंडणीची मागणी केली. सततच्या त्रासाला कंटाळून शिरसाट यांनी गंगापूर पोलिसांत तक्रार दिली.

त्यानुसार, शनिवारी रात्री गंगापूर पोलिसांनी जेहान सर्कल येथे सापळा रचून संशयित सारिका सोनवणे व तिचा मुलगा मोहित यास १० लाख रुपये घेताना ताब्यात घेतले.

संशयितेच्या घरातून १० लाख रुपये, एक लॅपटॉप, तीन आयफोन जप्त करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक (गुन्हे) तृप्ती सोनवणे तपास करीत आहेत.

"या गुन्ह्यात जे व्हिडिओ दाखवून तक्रारदारास ‘ब्लॅकमेल’ करण्यात आले आहे, त्या व्हिडिओची सत्यता पडताळणी केली जाईल. त्यानंतरच काय ते स्पष्ट होईल. यामागे आणखी कोणी आहे का, याचाही पोलिस तपास करीत आहेत."

- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT