घोटी (नाशिक) : जन्मतःच बाळाचे वजन कमी असणे, हा आता प्रसूतीमधील सर्रास दिसणारा प्रकार झाला आहे. मात्र घोटी (ता. इगतपुरी) येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील एका महिलेने चक्क पाच किलोच्या बाळाला जन्म दिला आहे. बाळाच्या नाळेचा मानेभोवती विळखा पडला असल्याने अतिशय गुंतागुतींची झालेली ही प्रसूती स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. रमेश सातपुते यांच्या टीमने यशस्वीरीत्या केली. सिझेरियननंतर बाळ आणि माता सुखरूप आहेत.
विशेष म्हणजे, या महिलेस बीपीचा त्रास होता. आई व बाळाला जोडणारी गर्भनाळ ही बाळाच्या मानेभोवती विळखा मारलेली असल्याने अनेक रुग्णालयांनी या महिलेला नाशिकला घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता.
मात्र घोटी शहरातील संजीवनी हॉस्पिटलचे स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने यशस्वी सिझेरियन केले. हे परप्रांतीय जोडपे येथे रोजगारानिमित्त आलेले असून, पती एका कंपनीत नोकरीला आहे. महिलेचे नाव नागलक्ष्मी आतलुरी (वय ३२) असून, नवजात बाळाचे वजन ५.२ किलो एवढे भरले आहे. नवजात बाळांचे वजन साधारणतः अडीच ते चार किलोच्या आसपास असते.
मात्र या बाळाचे वजन तुलनेत अगदीच जास्त आहे. जन्मतःच पाच किलो वजनाची जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील पहिलेच प्रकरण असू शकते, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. या पथकात भूलतज्ज्ञ डॉ. अभिनंदन सोनी, स्त्रीरोगतज्ज्ञ ज्ञानेश्वर शिरसाठ, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील बुळे यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.