accident sakal
नाशिक

Nashik Accident News: महामार्गाच्या सर्व्हिसरोडवर पादचारी अन त्र्यंबकरोडवर वाहनाच्या धडकेत महिला ठार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News: त्र्यंबकरोडवर रिक्षाच्या धडकेत मोपेडस्वार महिला तर, इंदिरानगर येथे सर्व्हिसरोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत फिरस्त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी इंदिरानगर, व सातपूर पोलिसात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. (woman men were killed in accident nashik news)

इंदिरानगर परिसरातील सूर्या सुप्रिया हॉटेलसमोर गुरुवारी (ता.३०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सर्व्हिस रोडवर भरधाव वेगातील वाहनाने अज्ञात पादचारी फिरस्त्याला धडक दिली. यात तो गंभीररित्या जखमी झाला असता, त्याच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

तर, त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नलजवळ रिक्षाचालकाने समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मोपेडस्वार महिला ठार झाली.

अर्चना रवींद्र पाटील (३६, रा. चामुंडानगर, अशोकनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या गेल्या बुधवारी (ता.२९) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास त्र्यंबकरोडने सातपूरकडे मोपेडने घरी जात होत्या.

त्यावेळी आयटीआय सिग्नलजवळ समोरून रिक्षाने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचे शुक्रवारी (ता.१) उपचारादरम्यान प्राणज्योत मालावली. याप्रकरणी सातपूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT