Godaghat esakal
नाशिक

Nashik News : लोखंडाच्या तुकड्यांसाठी ‘ते’ घालताहेत जीव धोक्यात!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगाघाटावर सध्या स्मार्टसिटीकडून मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. या वेळी पोकलॅन्ड मशिनद्वारे फोडण्यात आलेल्या आलेल्या रस्त्याखालील लोखंड गोळा करण्यासाठी कष्टकऱ्यांची झुंबड उडत आहे. (Women and children in forefront to collect iron on Ganga Ghat Nashik Latest Marathi News)

यात महिलांसह लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. गत दोन वर्षांपासून स्मार्टसिटीतंर्गत गंगाघाटासह शहराच्या विविध भागात विकासकामे सुरू आहेत, दोन दिवसांपासून म्हसोबा पटांगणावर नियोजित रथमार्गासाठी जुना रस्ता खोदला जात आहे. यासाठी जेसीबी, पोकलॅन्ड मशिनसह अन्य मशिनरीचा वापर सुरू आहे.

हे काम सुरू असताना जुन्या रस्त्याच्या खालून निघणारे लोखंड गोळा करण्यासाठी महिलांसह पुरुष मोठ्या संख्येने गोळा होत आहेत. यात लहान मुलांनाही मोठा समावेश असल्याने ते अधिक धोकादायक बनले आहे.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

दखलच घेत नाही

रस्ता फोडण्यासाठी स्मार्टसिटीच्या ठेकेदाराकडून अवजड यंत्रणेचा वापर केला जात आहे. मात्र, मशिनच्या चालकाकडून वारंवार विरोध होऊनही संबंधित त्याकडे दुर्लक्ष करत लोखंड गोळा करत आहेत. त्यामुळे संबंधितांना हे काम करताना कोणाला दुखापत व्हायला नको, याचीही काळजी घ्यावी लागत आहे.

याबाबत विचारले असता, संबंधित चालकाने वारंवार विनंती करूनही लोखंड गोळा करणारे ऐकत नसल्याचे सांगितले. या ठिकाणी थोडाफार पोलिस बंदोबस्त दिला तरच हे काम वेळेत होईल, असे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT