women are on guard all night for alcohol ban esakal
नाशिक

दारूची बाटली आडवी करण्यासाठी रणरागिणी देताहेत रात्रभर पहारा

एस. डी. आहीरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : एखादी घटना गावाला धडा शिकवून जाते. चाचडगाव (ता. दिडोंरी)मध्येही असेच घडले. तारूण्यात भरकटत व्यसनाच्या धुंदी चढलेल्या तिघा तरूणांनी अपघातात जीव गमावला. ऐन उमेदीच्या वयात तिघे कुटूंबाला सोडून गेल्याने चाचडगावमधील महिलांमध्ये व्यसनाधीनतेवरून उद्रेक झाला. चाचडगावमध्ये दारूची बाटली आडवी करण्यासाठी रणरागिणीनी कंबर कसली आहे. गावात तळीराम दिसताच त्याला अद्दल घडविण्यासाठी महिलांचा एक गट त्याला पळता भुई थोडी करून सोडते. गाव व्यसनमुक्त करण्याचा अशिक्षित व आदिवासी महिलांनी घेतलेला ध्यास तरूण पिढीचे पाऊल चुकण्यासापासून वाचविणार आहे.

दारूच्या नशेमुळे गावाच्या नावाला बट्टा

चाचडगाव (ता. दिडोरी) हे नाशिक-पेठ रस्त्यावर वाघाडधरणाच्या कडेला वसलेले अडीच हजार लोकसंख्येचे गाव. गाव तस चांगल...पण काही तरूण बुर्जुगांच्या दारूच्या नशेमुळे गावाच्या नावाला बट्टा लागला. व्यसनधीनतेमुळे तीन तरूणांनी अपघातात जीव गमावला. मुलांचे ऐन उभारते आयुष्य संपल्याने त्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. हेच दुःख इतर कुणाच्या वाट्याला येऊन नये व कर्ते पुरूष, तरूण दारूच्या नशेपासून दूर करण्यासाठी काही महिला संघटीत झाल्या. गावात दारूबंदीचा एल्गार केला. काबाडकष्ट करून मिळविलेली मेहनतीची कमाई दारूत वाया घालविणाऱ्यांचे प्रबोधन किंवा वेळ पडली तर रणरागिणीचा अवतार घेण्यास महिलांची ती टिम मागे पुढे पाहत नाही.

दररोज रात्री दहापर्यत पहारा....

महिलांनी गावातील अनाधिकृत दारूच्या अड्डयावर हल्लाबोल करून ती उध्दवस्त केली आहे. दिवसभर रोजदारी करून सायंकाळी घरकाम आटोपून या महिला हातात लाठी-काठ्या घेऊन बसस्थानकासह गावातील दारूड्या बसण्याच्या ठिकाणावर छापे टाकतात. दारूड्ये अन बाटल्या दिसल्या की त्यांना जाब विचारतात. वेळ प्रसंगी दणकेही देतात. त्यामुळे गावातील तळीरामांच्या पाचावर धारण बसली आहे. गेल्या आठ दिवसापासून अनधिकृत मद्यविक्री व मद्यपीचा बंदोबस्त झाला आहे. रात्री दहापर्यत मोठ्या धाडसाने या महिला खडा पहारा देत असल्याने दारूच्या नशेत तर्र होणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

या करताहेत जागरण

ताराबाई मोरे, सुक्राबाई गांगुर्डे, मीरा पोटिंदे, ताराबाई बोके, सीमाबाई उदार, अनुसया गांगुर्डे, इंदूबाई गांवढे, मंगल बोके, मंगल गांगोडे आदी महिलांचे दारूबंदीच्या दिशेने हे आक्रमक पाऊल टाकले आहे. सरपंच हर्षदा गावढे, दारूबंदीचे समितीचे अध्यक्ष बाळू उदार, उपाध्यक्ष आनंदा पेलमहाले, ग्रामपंचायत सदस्य सुनील पेलमहाले हे त्या महिलानां पाठबळ देत आहे.

''दारूच्या नशेत गावातील तरूण पिढी वाहत चालली आहे. त्यात तिघा जणांनी अपघातात प्राण गमावले. यापुढे जीवन व पैशाची हानी होऊ नये म्हणून गावात दारूबंदीचा आम्ही निर्धार केला आहे. दारूबंदीमुळे गावातील भांडणतंटे मिटून नागरिक गुण्यागोविंदाने नांदत आहे.'' - ताराबाई मोरे, चाचडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT