Female priest Vidyatai Gokhale esakal
नाशिक

पौरोहित्‍यातही महिलाराज : पूजकाचे समाधान हीच खरी पावती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विद्याताईंचे सासरे धार्मिक असल्‍याने त्‍यांच्या कानावर सतत मंत्राचे उच्चार, तसेच स्‍तोत्रांच्या उच्चारणाने त्‍यांनाही यात गोडी निर्माण झाली. बहिणीच्या प्रोत्साहनाने त्‍या पौरोहित्‍याकडे वळल्‍या. ‘सकाळ’शी संवाद साधताना त्‍यांनी त्‍यांच्या प्रवासाविषयी माहिती दिली. (women rule in priesthood vidyatai gokhale nashik Latest Marathi News)

विद्याताईंचे माहेर भुसावळचे, तर सासर नाशिकचे. त्‍यांचे सासरे अतिशय धार्मिक होते. त्‍यांची रोजची पूजा यशासांग असायची. मंत्रपठण उत्तम होते. यामुळे विद्याताईंचेही पठण होत असे. यामुळे त्यांना आवड निर्माण होऊ लागली.

त्‍यांची बहीण वि. भा. दांडेकर राणीभवनात होत्या. त्‍या दोघींनी २००३ मध्ये महिला पौरोहित्‍याच्या वर्गात प्रवेश घेतला. पहिले दोन वर्ष दुगलताईंकडे शिक्षण घेतले. नंतर तिसरे व चौथे वर्ष राणीभवनात शिक्षण घेतले.

पुढील वेदोक्‍त शिक्षण दुगलताईंकडे घेत आहेत. दुगलताईंची शिकविण्याची पद्धत, मंत्रोच्चार, त्‍यामागचे शास्‍त्र, अर्थ, स्पष्‍टता आदींमुळे खूप प्रभावीत झाल्‍या व आवडीने शिक्षण घेत आहेत. पौरोहित्‍य करताना घरून पाठिंबा व सहकार्य मिळाले. वेगळा विषय म्‍हणून घरच्यांनाही कुतूहल होते. त्याचा घरात खूप सकारात्‍मक परिणाम झाला.

मुलाचे श्रीसुत, पुरुष सुक्‍त, महिम्‍न हे तोंडपाठ झाले. सध्या तो अमेरिकेत असला, तरी इकडे आल्‍यावर उपनिषधांच्या पुस्‍तकांचे वाचन करतो. त्‍यामुळे खप छान वाटते. मंत्रोच्चारणाने व्यक्तिगत विकासही खूप छान होतो.

संयम ही अतिशय महत्त्वाच्या गोष्टीचा अंगीकार होतो. त्‍यामुळे अडचणींना तोंड देताना सोपे जाते. मंत्रोच्चार, अर्थ व शास्त्राचे आकलन झाल्‍याने पूजा करताना, तसेच करवून घेताना एक वेगळाच उत्‍साह असतो. कोरोना काळात ऑनलाइन वर्ग घेतले.

ज्‍येष्ठ महिलसांसाठी गीतेचे वर्ग घतले. शिकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. या वयातही ‘आपण काही ना काही शिकतो’, याचा आनंद प्रत्‍येकीच्या चेहऱ्यावर असतो. यामुळे खूप प्रसन्न व समाधान वाटते. पौरोहित्‍य करताना पूजकाच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही देऊन जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT