Asha ugalmugale esakal
नाशिक

Womens Day 2023 : School Vanचे स्टेअरिंग घेत कुटुंबासाठी जागविली ‘आशा’

माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : पती काळीपिवळी टॅक्सी (Taxy) चालवितात. घरची स्थिती बेताचीच, त्यामुळे एकट्याच्या कमाईवर भागत असले तरी गरजा पूर्ण होत नव्हत्या. (womens day 2023 Asha ugalmugale started school van driving to support her family nashik news)

मुलांची जबाबदारीही वाढत गेल्याने आशाबाई उगलमुगले (Asha ugalmugale) यांनी एक धाडसी निर्णय घेतला, तो म्हणेज स्वतः स्कूल व्हॅन चालविण्याचा अन त्या जिद्दीने शिकल्याही. गेल्या दहा वर्षापासून त्या वैनतेय विद्यालयासाठी मुलांची ने-आणकरत आहेत. त्यातून दोन पैसे हाती आले अन कुटूंबाला हातभार लागला. आपल्या दोन्ही मुलांना जलतरण आणि नेमबाजी या क्रीडाप्रकारात करिअरसाठी त्यांची धडपड सुरू आहे.

मूळच्या निफाडच्या असलेल्या आशाबाईंची घरची स्थिती जेमतेमच. शेती नसल्याने उदरनिर्वाहासाठी पती नाशिक -औरंगाबाद मार्गावर काळीपिवळी टॅक्सी चालवितात. त्यांच्या एकट्याच्या कमाईतून भागत नसल्याने त्यांनी पतीला साथ देण्यासाठी दोन पैसे कसे कमविता येतील यासाठी विचार सुरू केला अन मुलांना शाळेत ने-आण करण्याचे ठरविले.

त्यासाठी वाहन चालविता येण्याची गरज होती. साधी सायकलही चालविता येत नसल्याने चारचाकी कशी चालविणार हा प्रश्‍न होता,मात्र त्या डगमगल्या नाहीत. संसाराला रथाला हातभार लावण्यासाठी त्यांनी घरच्या सर्व जबाबदाऱ्या लिलया पार पाडत स्कूल व्हँनचे स्टेअरिंग हाती घेतले.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करत दहा वर्षापासून त्या निफाडला वैनतेय विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. पती स्वतःच काळी पिवळी चालत असल्याने त्यांनी मला वाहतुकीच्या नियमानसंदर्भात मार्गदर्शन केले त्यामुळे निफाड शहर परिसरातील नागरिक सुरक्षित प्रवासासाठी नेहमीच मला साथ देत आले आहे.

या साऱ्या प्रवासात त्यांना सासू-सासरे, पतीसह घरच्यांनी खंबीर साथ दिली हे त्या आवर्जून सांगतात. त्यातच नाशिक येथे सातपूरला एक्सेल टार्गेट शूटिंग येथे नेमबाजीसाठी मुलांना नेआण करण्याची संधी त्यांना मिळाली. नाशिक येथील स्वर्गीय मोनाली गोरे तसेच श्रद्धा नलमवार मॅडम या आंतरराष्ट्रीय नेमबाजांशी संपर्क आला आणि मुलांनाही या क्षेत्रात उतरविण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

निफाड शहरातील स्त्रियांना कुठे जायचे असले तर त्या मलाच बोलवितात एवढी आता माझी जाहिरात झाली आहे, याचा अनेकदा अभिमानही वाटतो. गाडी भाड्याने करतात,मलाही दोन पैस मिळतात अन त्यांचा प्रवासीह सुरक्षित होतो. गावकरी, पोलिस व समाजातील सर्व घटकांचे मला सहकार्य लाभले आहे. आपण देत असलेली सेवा सुरक्षित कशी राहील याबाबत मी दक्ष असते असे त्या सांगतात.

मुलांच्या करिअरसाठी त्यांना नेमबाजी आणि जलतरणचे शिक्षण देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. महागडे असले तरी त्यासाठी आपण भरपूर मेहनत करू असे त्या आत्मविश्‍वासाने सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT