Road excavated in the middle of the highway for the ongoing flyover work near Ghoti on the Mumbai Agra highway. In the second photo, deep ditches are seen next to the site strips on the highway. esakal
नाशिक

Nashik News: घोटीजवळ उड्डाणपुलाचे काम संथ! वाहनधारकांची ऐन पावसाळ्यात अडथळ्याची शर्यत, विलंब का?

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर सध्या घोटीजवळील सिन्नर फाट्यावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.

निर्धारित कालावधीपेक्षा दुप्पट कालावधी होऊनही या कामाने अजून बाळसे धरलेले नाही हे विशेष. मधोमध खोदलेला रस्ता, वाहतुकीसाठी चिंचोळी जागा यातून वाहतुकीची कोंडीत र होत आहे.

सध्या पावसामुळे तर वाहनचालकांची मोठीच गैरसोय होत आहे. अडथळ्याची शर्यत पार करीत वाहनचालकांना जावे लागत आहे. हे काम का लांबत आहे, याचा पाठपुरावा करण्यास ना आमदार ना खासदारांना वेळ नाही अशी टीका वाहनचालक करू लागले आहेत. (work of flyover near Ghoti delay Obstacle race of motorists in rainy season Nashik News)

घोटी शेजारील सिन्नर फाटा ही चौफुली सर्वांत वर्दळीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या चौफुलीवर विचित्र अपघातांमध्ये असंख्य जणांचे बळी गेले आहेत. नगर जिल्ह्यासह, सिन्नरला जोडणारा मुख्य दुवा म्हणून या चौफुलीला ओळखले जाते.

या ठिकाणी अपघाताची साखळी थांबावी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्र्यालयाकडून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत खासदार हेमंत गोडसे यांनी खंबाळे ते घोटी येथील श्रीरामवाडी येथील डोंगराच्या खिंडीपर्यंतचा अंदाजे दीड किलोमीटरचा उड्डाणपूल मंजूर केला आहे.

या महामार्गाचा व उड्डाणपुलाचा शुभारंभ २०२० मध्येच झाला आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होऊन तीन वर्षे उलटूनही अजूनपर्यंत पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. आणखी वर्षभराचा कालावधी लागणार असल्याने वाहनचालकांसह समस्त घोटीकरांतर्फे तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत घोटी येथील दीड किलोमीटर उड्डाणपुलाचे बजेट ५० कोटींचे असून, हे काम मुंबई नाशिक एक्स्प्रेस वे लिमिटेड या कंपनीला मिळाले आहे. त्यांनी उपकंत्राटदार नेमून रॉकटेक या कंपनीला दिले आहे.

रॉकटेक या कंपनीने हे काम दीड वर्षात पूर्ण करावयाचे होते. मात्र तब्बल ३ वर्षांचा कालावधी लोटूनही काम पूर्ण होऊ शकलेले नाही. पुलाच्या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे ठरलेल्या वेळेत पूर्ण तर झालेच नाही.

अजून एक वर्षभराचा कालावधी पूर्ण होण्यासाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा मनमानी करणाऱ्या ठेकेदाराला प्रशासकीय पातळीवर, उड्डाणपुलाच्या कामाचा दर्जा व कालावधी याबाबत चौकशी करून रॉकटेक या कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच त्यांना बिले मिळत नसतील तर लोकप्रतिनिधींनी तो प्रश्नही मार्गी लावावा असेही नागरिक म्हणत आहेत.

रस्त्याच्या कडेला पुलाच्या खड्ड्यांना मोकळे सोडण्यात आले असून या ठिकाणी कुठल्याही क्षणी गाड्या घुसू शकतात किंवा मोठा अपघात उद्भवू शकतो. रस्ता विकासाच्या नावावर स्थानिक नागरिक, व्यापारी व वाहनधारकांना वेठीस धरणे हा कुठला विकास? ही घोटीकरांची आर्त हाक कोण ऐकणार असा प्रश्न उभा ठाकला आहे.

मुजोर बांधकाम कंपनीच्या ढिसाळ नियोजनांमुळे अजून किती अपघात होतील? किती बळी घेतल्या जातील आणि वाहतूक कोंडीत तासनतास ताटकळत किती दिवस बसावे लागेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

"सिन्नरफाटावरील उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. अपेक्षेपेक्षा दुप्पट वेळ घेऊनही संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केलेले नाही. ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि काम त्वरित पूर्ण करून तालुक्यातील नागरिकांची हेडसांड थांबवावी." - काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार इगतपुरी

"उड्डाणपुलाचे बांधकाम आता रोजच्या पावसामुळे येणाऱ्या अडचणींमुळे संथ गतीने सुरू असले, तरी या कामाला अजून अंदाजे ७ ते ८ महिन्याचा कालावधी लागणार आहे. ठेकेदाराला पावसाळ्यात या मार्गावर उद्भवणाऱ्या अडचणीबाबत विविध सुविधा पुरवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत."

- भाऊसाहेब साळुंके, प्रोजेक्ट डायरेक्टर, नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT