नाशिक : जानेवारीअखेर मराठा सर्वेक्षणाचे फॉर्म भरून शासनाला अहवाल सादर करायचा असल्याने शहरी भागात महापालिकेची यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. जवळपास २६०० प्रगणकांच्या माध्यमातून सर्वेक्षणाच्या कामाला सुरवात झाली आहे.
या सर्वेक्षणामुळे महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. दरम्यान, सर्वेक्षण करताना सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. (work of Nashik Municipal Corporation stopped Result of Maratha Survey server down NMC News nashik)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण केले. त्या उपोषणात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने मराठा समाजाचे आंदोलन चर्चेत आले.
जरांगे-पाटील यांनी आंदोलनाची धार तीव्र करताना थेट राज्य सरकारविरोधात दंड थोपटले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आंदोलन तीव्र झाले. राज्य शासन व उपोषणकर्ते जरांगे-पाटील यांच्यातील चर्चेच्या फेऱ्या अधिक वाढल्या.
अखेरीस महिना, दीड महिन्याच्या कालावधीनंतर जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी राज्य शासनाने कुणबी नोंदीचा शोध घेण्याचे फर्मान शासकीय यंत्रणेला सोडले.
एकीकडे आरक्षणासाठी माहिती संकलित केली जात असताना दुसरीकडे जरांगे-पाटील यांचे आंदोलनाची वेळ जवळ आल्याने राज्य शासनाने मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा इम्पेरिकल डेटा संकलित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला केल्या व जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरी भागात महापालिकेला माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या.
महापालिकेचे २६०० कर्मचारी प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत घरोघरी जाऊन माहिती संकलित करायची आहे. त्याचे काम मंगळवार (ता.२३) पासून सुरू झाले.
प्रगणकांवर लक्ष ठेवण्यासाठी १५९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणाकरीता प्रभागनिहाय ३१ पर्यवेक्षक नियुक्ती करण्यात आले आहेत. २६०० कर्मचाऱ्यांची मराठा सर्वेक्षणाकरीता नियुक्ती करण्यात आल्याने महापालिकेच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट असून, कामकाज ठप्प झाले आहे.
सर्वेक्षणासाठी प्रगणकांना शासनाने ॲप उपलब्ध करून दिले असून प्रत्येक कुटुंबासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागत आहे. जवळपास १७९ प्रश्न आहेत. सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यात सर्व्हर डाऊनचा सामना करावा लागला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.