कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या कामाला पुन्हा गती येणार आहे.
नाशिक : कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे (Nashik Pune Semi High Speed Railway मार्गाच्या कामाला पुन्हा गती येणार आहे. रेल्वेमार्गासाठी जिल्ह्यातील २३ गावातील सुमारे सव्वा दोनशे हेक्टर भूसंपादनाच्या विषयाला उद्या सोमवार (ता.३१) गती येणार आहे. (work on nashik-pune semi high speed railway line will be revived)
पुणे नाशिक नगर हा महाराष्ट्रातील औद्योगिक व कृषी विकासाचा संपन्न पट्टा हे. रेल्वेमार्गामुळे या दोन्ही शहरातील दळणवळण वाढून त्याला अधिक गती येणार आहे प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेमुळे या तीन्ही जिल्ह्यातील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळे फाटा, संगमनेर आणि सिन्नर या भागातील महत्वाचे उद्योग, कृषी केंद्र रेल्वेमार्गामुळे जोडले जाणार आहे. २३५ कि.मी ग्रीन फील्ड सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वेमुळे अवघ्या पावणे दोन तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे. द्राक्ष, कांदे, भाजीपाला,डाळिंब (नाशिक), औद्योगिक कारखाने (सिन्नर), साखर, कांदे, बटाटे, अन्नधान्य, डाळींब, दूध उत्पादन (संगमनेर), टोमॅटो, झेंडू, गुलाब, अन्नधान्य, दुध (जुन्नर-आंबेगाव), ऊस, फूड प्रोसेसिंग (खेड), कांदे, साखर, भाज्या फुले, द्राक्ष (पुणे) अशा तिन्ही जिल्ह्यातील कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ होणार आहे.
२३ गावात भूसंपादन
जिल्ह्यातील नाशिक आणि सिन्नर अशा दोन तालुक्यातील देवळाली, विहीतगाव, बेलतगव्हाण, संसरी, नाणेगाव, (नाशिक) वडगाव पिंगळा, चिंचोली, मोह, वडझिरे, देशवंडी, पाटप्रिंपी, बारागाव पिंप्री,कसबे सिन्नर, कुंदेवाडीमजरे,मुसळगाव,गोंदे, दातली, शिवाजीनगर दोडी खुर्द आणि बुद्रुक नांदूर शिंगोटे, चास नळवंडी (सिन्नर) अशा २३ गावातून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. भूसंपादनाची उद्या सोमवारी बैठक होणार आहे. भूसंपादन करावयाच्या गावाची यादी निश्चित झाली असून समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर वाटाघाटीतून भूसंपादन (Land acquisition) होणार आहे.
अवघ्या पावने दोन तासात होणार प्रवास
तीन्ही जिल्ह्यातून जाणरा हा रेल्वेमार्ग २३५ किलोमीटरचा असून अवघ्या पावने दोन तासात हा प्रवास असेल. प्रति तास २०० किलोमीटर वेगाने रेल्वे धावतील. पार्सल व्हॅनची सुविधा असलेला हा रेल्वेमार्ग नाशिकला ओझर आणि पुणे विमानतळाशी जोडलेला असेल त्यामुळे कार्गो वाहतूकीशी जोडला जाणार आहे. नाशिक रोड, शिंदे, मोहदरी, सिन्नर, दोडी, पलसखेडे, सोनेवाडी, संगमनेर, अंभीरे, साकूर, जांबूत, बोटा, आळे फाटा, भोरवाडी, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, वाघोली, केलवडी, , मांजरी, हडपसर, पुणे अशा चौदा स्थानकाचा समावेश असलेल्या या रेल्वे मर्गावर प्रवाशी वाहतूकीला गती येणार आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे काम काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन महामंडळातर्फे होणार आहे.
(work on nashik-pune semi high speed railway line will be revived)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.