Jalyukta Shivar Yojana : शिवार पाणीदार करण्यासाठी जलसंधारणाला बळकटी देण्यासाठी आणि टंचाई दूर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाने पहिल्याच टप्प्यात तालुक्यातील जनतेची निराशा केली आहे. आशांना दगा दिला आहे.
जलयुक्त शिवार योजनेतंर्गत तालुक्यातील १६ गावात १८३ कामे होऊन तब्बल ८ कोटी ९४ लाखाचा खर्चाचा आराखडा मंजूर केलेला असताना केवळ १३ कामांसाठी २ कोटी ६४ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
त्यातही जलसंधारणाला बळकटी देण्यासाठी नवनिर्मितीची कामे न करता जुन्या सिमेंट बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे या निधीत होणार असल्याने शिवार कसा पाणीदार होणार आणि शेती कशी फुलणार हा प्रश्नच आहे. (Works of 2 5 crore out of 9 crore approved under Jalyukta Shivar Yojana in yeola nashik news)
जिल्ह्यातील २३१ गावांमध्ये जलसंधारणाची २ हजार ९४३ कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यासाठी २०६ कोटींच्या खर्चाच्या आराखड्यास मान्यता दिली असताना प्रत्यक्षात २९ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
तालुक्यातील आहेरवाडी, एरंडगाव खुर्द, एरंडगाव बुद्रूक, कानडी, कोटमगाव बुद्रूक, कोटमगाव बुद्रूक, खैरगव्हाण, गोपाळवाडी, नायगव्हाण, पिंपळखुटे खुर्द, बदापूर, भुलेगाव, मातुलठाण, रायते, लहित, शिरसगाव लौकी या गावांचा समावेश करून योजनेतंर्गत तालुक्यातील १६ गावात १८३ कामे प्रस्तावित केली आहेत. यासाठी तब्बल ८ कोटी ९४ लाखाचा खर्च प्रस्तावित आहे.
मुळात तालुका अवर्षणप्रवण व दुष्काळी असल्याने येथे पावसाचे पडलेले पाणी अडवून जिरविणे गरजेचे आहे. कितीही पाऊस झाला तरी तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील पाणी वाहून जाते, परिणामी दिवाळीनंतरच पाणी टंचाई भेडसावू लागते.
यापूर्वीही तालुक्यात पहिल्या जलयुक्त शिवार योजनेची अनेक कामे झाली. पण त्यामुळे अधिकाधिक क्षेत्र ओलीताखाली आणणे, गावे टँकरमुक्त करणे शक्य झालेले नाही. आता दुसऱ्या टप्प्यात तब्बल १८३ कामे धरली असताना किरकोळ स्वरुपाची कामे मंजूर झाल्याने योजनेचे फलित काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पहिल्या टप्प्यात जलसंधारण विभागाने भुलेगाव येथे दोन व बदापुर येथे सिमेंट काँक्रिट बंधाऱ्याच्या दुरुस्तीची ७४ लाख ४४ हजाराची तीन कामे तर कोटमगाव खुर्द, कोटमगाव बुद्रुक,बदापूर, भुलेगाव,एरंडगाव,शिरसगाव लौकी येथे सिमेंटच्या बंधाऱ्याचे दुरुस्तीची तर कानडी येथे गावतळे दुरुस्तीची एक कोटी तीन लाखाची कामे होणार आहेत.
वनविभागाने भुलेगाव येथे सलग समतल चर व लहान माती बांध तर आहेरवाडी येथे सलग समतल चर अशी ८५ लाख ९१ हजाराची तीन कामे धरली आहेत. मुळात अगोदरच गावे व कामांची संख्या कमी धरलेली असताना त्यातच मंजुरी मोजक्याच गावातील कामांना मिळाल्याने नाराजी देखील व्यक्त होत आहे.
पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक निधी
तालुकानिहाय व गावनिहाय कामे मंजूर करताना कोणते निकष लावण्यात आले, याबाबत स्पष्टता दिसत नसली तरी मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी यांचे वजन मात्र यात महत्वाचे ठरल्याचे आकडे सांगतात. पालकमंत्र्यांच्या मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ३ कोटी २५ लाख तर त्या खालोखाल दिंडोरीत ३ कोटी ११ लाखांची व बागलाणमधील २ कोटी ८४ लाखांची कामे मंजूर केली आहेत.
नांदगावमध्ये २ कोटी ७३ लाखांची कामे मंजूर केली असून मंत्री छगन भुजबळ यांच्या तालुक्यात २ कोटी ६३ कोटींची कामे मंजूर केली आहेत. वास्तविक दुष्काळी व अवर्षणप्रवण असल्याने येवल्याला जलसंधारणाची मोठी कामे धरून अधिकच निधी मिळणे अपेक्षित होते.
आराखड्यात धरलेली विकासकामे
विभाग प्रस्तावित कामे अंदाजित निधी
मृद व जलसंधारण विभाग १२ ३ कोटी ५० लाख
तालुका कृषी अधिकारी ८८ ८८ लाख
लघु पाटबंधारे उपविभाग १४ २ कोटी ८८ लाख
वन परिक्षेत्र अधिकारी ६९ १ कोटी ६८ लाख
एकूण कामे १८३ ८ कोटी ९४ लाख
"फुटकळ दुरुस्त्या करून तालुका जलयुक्त अन टंचाईमुक्त करणे अशक्य आहे. तसेच दुरुस्तीवर होणारा कोट्यवधींचा खर्च आणि होणारा पाणी साठा यांचा ताळमेळ लागत नाही. लाभव्यय गुणोत्तर त्र्यसथ यंत्रणेकडून तपासून घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील प्रलंबित साठवण तलावांची कामे मार्गी लावण्याची गरज आहे. यंदाचे वर्ष कमी पावसाचे असल्याने आजपासूनच उपलब्ध पाणी वापराचे नियोजन करणे गरजेचे आहे." -भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समित
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.