Dilip Khaire etc. while inspecting the expansion work of Darswadi-Dongargaon canal.  esakal
नाशिक

Nashik News: दरसरवाडी ते डोंगरगाव कालव्याच्या विस्तारीकरणाचे एकावेळी 4 ठिकाणी कामे सुरू

पुणेगाव-दरसरवाडी ते डोंगरगाव कालव्याच्या अस्तरिकरणाच्या (काँक्रिटीकरण) कामाला गती मिळाली आहे.

सकाळ वृतसेवा

Nashik News : पुणेगाव-दरसरवाडी ते डोंगरगाव कालव्याच्या अस्तरिकरणाच्या (काँक्रिटीकरण) कामाला गती मिळाली आहे. सध्या दरसरवाडी ते डोंगरगाव या ८७ किलोमीटर कालव्याचे ‘लेव्हलिंग’ व विस्तारीकरणाचे एकावेळी चार ठिकाणी काम सुरू आहे. त्याचप्रमाणे कंपनीतर्फे पाच ठिकाणी मिक्सर प्लँटचे काम सुरू आहे.

राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी कालवा कामाची पाहणी करून कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. (works of expansion of Darsarwadi to Dongargaon canal are going on at 4 places simultaneously nashik news)

गेल्या ५० वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा करीत असलेला कालवा भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न २०१९ मध्ये बाळापूरपर्यंत पूर्ण झाले खरे. परंतु, त्यापुढे चार वर्षांत कोरोना संकट, सरकारी अडचणींमुळे कामात अडथळा आल्याने कामात समाधानकारक प्रगती झाली नाही. त्यामुळे कालव्याला पाणी येणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये तयार झाली होती.

श्री. भुजबळ यांनी पुणेगाव ते दरसवाडी या ६३ किलोमीटर विस्तारीकरण, अस्तरीकरणासाठी ९६ कोटी, तर दरसवाडी ते डोंगरगाव या ८७ किलोमीटर कालवा विस्तारीकरण, अस्तरीकरण, गेट, पूल या कामासाठी १४६ कोटी असे एकूण २४२ कोटींचा निधी मंजूर केला. कामाला सुरवात झाल्याने तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातून काम पूर्ण होण्याच्या आशा बळावल्या आहेत.

कालव्यावर प्रत्येकी २० किलोमीटर अंतरावर काम सुरू झाले असून आधुनिक यंत्रांद्वारे काम केले जाणार आहे. पुणेगाव ते दरसवाडी या ९६ कोटींच्या कामात अस्तरीकरण, काँक्रिटीकरण, पूल, कालव्याखालून जाणारे पाण्यासाठी एच.पी.डी., नदीवरील पूल, कालव्याची गरजेनुसार संरक्षक भिंत, गेट आदी कामांचा समावेश आहे. सध्या ३७ ते ६३ किलोमीटर येथे यंत्राने कालवा ‘लेव्हल’, साफसफाईचे काम सुरू आहे.

पुलांची कामे

दरसवाडी ते डोंगरगाव या ८७ किलोमीटरच्या कामात विस्तारीकरण, काँक्रीटीकरणासह कातरणी शिवारात ३ पूल, बाळापूर, सावखेडे, कुसमडी, नगरसूल, न्याहारखेडे, अंगुलगाव, तळवाडे या गावांच्या शिवारात मागणीप्रमाणे प्रत्येकी १ पूल, कुसूर, हडपसावरगाव, वाईबोथी या गावांच्या शिवारात प्रत्येकी २ पूल (एकूण मंजूर २२ पैकी १६ पूल येवला तालुका हद्दीत), वाईबोथी (७० किलोमीटर) व न्याहारखेडे (७५ किलोमीटर) येथील नदीवरील मोठे २ पूल, बंधारे भरण्यासाठीचे गेट व अनेक लहान कामे यात घेण्यात आली आहेत. कालव्यावर प्रत्येकी २० किलोमीटरमध्ये वेगवेगळ्या यंत्रणांनी सर्वत्र सोबत काम सुरू आहेत. ८७ किलोमीटरमध्ये कंपनीने ४ ठिकाणी कर्मचारी ‘कॅम्प’ केले असल्याची माहिती श्री. खैरे, आंदोलक मोहन शेलार यांनी दिली.

भुजबळांकडून दररोज आढावा

श्री. भुजबळ हे पालकमंत्री असताना कालव्यातील पाणी प्रवाहात होत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी कालव्याची पूर्ण १५० किलोमीटर कालवा समपातळी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याच सर्वेक्षणानुसार कालव्याचे समपातळी काम सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. कालव्याचे काम योग्य दर्जाचे व्हावे, पावसाळा सुरू होण्याच्या आत काम पूर्ण होऊन पाणी डोंगरगावपर्यंत जाण्याचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे, यासाठी श्री. भुजबळ हे कामाचा दररोज आढावा घेत आहेत. त्यांच्या सूचनेवरून श्री. खैरे यांनी पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष साहेबराव मढवई, सुनील पैठणकर, नितीन गायकवाड, संतोष खैरनार, सुमीत थोरात, अरुण शिरसाठ, भाऊसाहेब धनवटे, गणेश गवळी, गोटू मांजरे आदी उपस्थित होते.

"पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा हा येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागातील शेतकऱ्यांचा तीन पिढ्यांचे स्वप्न आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणे आणि मतदाराला दिलेला शब्द खरा करण्यासाठी हे मंत्री छगन भुजबळ यांचे प्रयत्न सुरु आहेत. पाणी येताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी अस्तरीकरणाला निधी मंजूर असून या कामाला गती देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत." - दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT