Goat Farming Workshop in Nashik : देशातून सुमारे ९० टक्के शेळी-मेंढीच्या मांसाची निर्यात होते. त्यामुळे ‘कमर्शिअल बंदीस्त शेळी आणि मेंढीपालन’ व्यवसायात वाढत्या संधी आहेत. परंतु या व्यवसायात चोख व्यवस्थापनाला अतिशय महत्त्व आहे.
यावर याचे यश अवलंबून आहे. शेळी-मेंढीपालनात यशस्वी कसे व्हावे, या बाबत माहिती करून देणारी एक दिवसीय कार्यशाळा रविवारी (ता.३०) सकाळ व ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे आयोजिली आहे. (Workshop Bandist goat farming Get Mantra of Success One day special workshop in Nashik news)
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
यात स्वतः यशस्वी शेळी-मेंढीपालन उद्योजक या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, व्यवस्थापनात कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करणार आहे.
शेळी-मेंढीचे शास्त्रोक्त संगोपन, गोठा व्यवस्थापन, व्यवसायाचे अर्थशास्त्र, आजार व उपाययोजना, लसीकरण, शासकीय योजना व अनुदान इ.विषयांचा समावेश आहे. जेवण, प्रमाणपत्रासह प्रति व्यक्ती १५०० रूपये शुल्क आहे. आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी संपर्कः ९२८४७ ७४३६३
कार्यशाळा : ता.३० एप्रिल २०२३
ठिकाणः सकाळ कार्यालय, सातपूर एमआयडीसी, त्र्यंबक रोड, नाशिक
वेळः सकाळी १० ते सायंकाळी ५
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्कः ९२८४७ ७४३६३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.