World Economic Forum esakal
नाशिक

World Economic Forum : विदेशी गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ परिषदेत नाशिकचे विशेष Branding!

सकाळ वृत्तसेवा

सातपूर (जि. नाशिक) : एका बाजूला दावोस परिषद व मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापत असताना एमआयडीसीचे नाशिक प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मात्र या परिषदेच्या माध्यमातून नाशिकला विदेशी गुंतवणूक आकर्षण करण्यासाठी विशेष ब्रँडिंग करण्यावर भर दिला आहे.

यासाठी प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी व अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे, कार्यकारी अभियंता जयंत बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी कामाला लागल्याचे बघावयास मिळत आहे. (World Economic Forum Special Branding of Nashik in Davos Conference for Foreign Investment nashik news)

गुजरात निवडणुकीनिमित्त महाराष्ट्र येऊ घातलेल्या मोठे प्रकल्प गुजरातला घेऊन गेल्याचा आरोप पुसण्यासाठी खास करून महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार दावोस येथील उद्योग परिषदेमध्ये जाऊन महाराष्ट्राचे ब्रँडिंग करणार आहेत.

याच परिषदेच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोसह इतर प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यासाठी येत असल्याने यावरून सेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी यांचा दौरा पुढे ढकलून शिंदे-फडणवीस यांनी दावोस परिषदेत जाऊन विदेशी गुंतवणुकीचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, अशी टीका केल्याने उद्योगमंत्री उद्धव सामंत यांच्या नेतृत्वाखाली दावोस परिषदेसाठी एमआयडीसीतील मुंबई, पुणे, औरंगाबाद नाशिकसह नागपूर, अमरावती विभागातील अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

आपापल्या विभागातील उपलब्ध असलेली जागा, मोठ्या उद्योगाला पूरक असलेले लघुउद्योगांची साखळी, कुशल मनुष्यबळ आदींसह मूलभूत सुविधा, दळणवळण साधन त्यात झपाट्याने होत असलेली वाढ आदींचा सविस्तर अहवाल घेत आहेत.

दावोस येथे १६ जानेवारीपासून जागतिक गुंतवणूक परिषद होत आहे. या परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करार करणार आहेत. येथे अनेक हजार, कोटी रुपयांचे करार निश्चित होतील, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT