'रिलॅक्‍स कॉर्नर' हॉटेल चालवणाऱ्या भीमाबाई जोंधळे व त्यांचा मुलगा प्रवीण जोंधळे esakal
नाशिक

जागतिक अन्नसुरक्षा दिनविशेष : 'जेवणासोबत पुस्तकांची मेजवानीची'

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सत्‍तर वर्ष वय असलेल्‍या आजींच्या हातची झुणका- भाकरी, शेवभाजीची चव अनुभवण्यासाठी दूरदूरहून लोक येतात. अनेक अभिनेते, नेते, साहित्यिकांनी वेळोवेळी आजीच्या चवीला दाद देत गौरव केला आहे. आज जागतिक अन्नसुरक्षा दिवस साजरा होत साजरा होत असताना अशाच आतापर्यंत हजारोंच्या जिभेवर ज्यांच्या हातच्या पदार्थाची चव रेंगाळत आहे. अशा सत्तरीतील आजीबाईंच्या अन्न सेवेविषयी...

भीमाबाई जोंधळे, असे सत्तरीतील आजीबाईचे नाव आहे. ओझर दहा मैलावर त्यांचे ‘रिलॅक्स कॉर्नर’ हे आजीबाईंमुळे पंचक्रोशीतच नव्हे तर दूर चित्रनगरीतील अनेक तारा तारक्यांचे पसंतीचे ठिकाण बनले आहे. आठवड्यातून एकदा मिळालेली सुटीत कुटुंबांची हॉटेलला पसंती जास्‍त दिसून येते. सुटीच्या दिवसात ठिकठिकाणचे हॉटेल गजबजून जातात. हॉटेलमध्ये ग्राहकांचे अक्षरशः वेटिंग असते. एवढ्या मोठया प्रमाणात लोकांची हॉटेलला पसंती मिळते. विशेषतः हॉटेलमधील चव, स्‍वच्छता, वेगळेपण यावर अवलंबून असते. शाकाहाराला महत्त्व देत आजीबाईने सुरू केलेले रिलॅक्स कॉर्नर शुध्द शाकाहारी नाष्‍टा व जेवणासाठी प्रसिद्ध आहे.

समाजोपयोगी संकल्‍पना
रिलॅक्‍स कॉर्नरची खासियत म्‍हणजे समाजोपयोगी संकल्‍पनेवर आधारित आजच्या डिजिटल युगात वाचनाची आवडही तितकीच जोमाने टिकून राहावी याकरिता एक आगळावेगळा उपक्रम म्‍हणजे प्रत्‍येक टेबलवर मेनू कार्ड व पुस्‍तक आहे. हॉटेलमध्येच असलेल्‍या ग्रंथालयात कथा, कादंबऱ्या अशा विविध पुस्‍तके आहेत. तसेच, कवितांचे पोस्‍टर ही दर्शनी भागात लावलेले आहेत. अगदी सहजरित्‍या ग्राहकाने प्रवेश केल्‍याबरोबर कवितावाचन करतो. २०१५ पासून छोटेखानी ग्रंथालय व हॉटेल ग्राहकांच्‍या सेवेत कार्यरत आहे. हॉटेलमध्ये आलेला प्रत्‍येकजण हे पाहून आश्चर्य आणि कुतूहलाने आपल्‍या टेबलावरचे पुस्‍तक हातात घेऊन चाळत जेवणाचा आस्‍वाद घेतो.

मान्यवरांची मांदियाळी
महाराष्ट्रीयन बरोबरच पंजाबी डिशचे मेनू रिलॅक्‍स कॉर्नरची मिसळ प्रसिद्ध आहेच. तसेच, आजींच्‍या हातची झुणका- भाकरी, शेवभाजी यालाही ग्राहकांची विशेष पसंती आहे. भाज्‍यांमध्ये आजींच्या हातचा काळा मसाला, गरम मसाला याचा वापर असल्‍याने चव अगदी घरच्यासारखीच. रिलॅक्‍स कॉर्नरला साहित्‍यिक राजन गवस, अभिनेते तसेच राजकीय मंडळी भेट देत असतात. अभिप्राय नोंदविण्यासाठी डायरी ठेवली आहे.

"आईचे वय ७० वर्ष आहे, अजूनही आईच्‍या हातच्‍या पदार्थांची चव घेण्याकरिता विशेषतः झुणका भाकरी खाण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असते."

- प्रवीण जोंधळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT