Nashik News : पिंपळसोंडपैकी उंबरपाडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा मृत्युमुखी पडला असून ही घटना गायी चारणाऱ्याच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा सुरु केल्याने बिबट्या पसार झाला. सात ते आठ दिवसापूर्वीच एका वासराला बिबट्याने फस्त केले होते. पाच महिन्यातील ही चौथी घटना आहे. (Worried about increasing loss of animals in leopard attacks in Umbarpada area Nashik News)
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
दोन बकऱ्या व एक बोकड बिबट्याने फस्त केला आहे. दहा ते बारा वर्षांपूर्वी आठ वर्षीय मुलीला बिबट्याने अंगणातून उचलून नेले होते. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा भाग डोंगराळ व अतिदुर्गम, खोल दरी, जंगलव्याप्त असून गुजरात सीमावर्ती डांग जिल्ह्यातील वघई राखीव वनक्षेत्रास लगतचा आहे.
गुजरात वनविभागाने सात ते आठ बिबटे त्यांच्या वन हद्दीत आणून सोडले आहेत.अंबिका नदीच्या पात्रात पाणी उपलब्ध असल्याने खोऱ्यात जंगल असल्याने रोजच या भागात बिबट्याचे दर्शन होते. बिबट्याच्या सततच्या डरकाळीने नागरिक भयभीत असतात. बिबट्यामुळे झालेल्या जिवितहानीची शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.
"केवळ एखाद्या बिबट्याला पकडून बंदोबस्त करता येत नाही. बिबट्या दिसला तर जोरात आरडाओरडा करावी. रात्री अपरात्री एकट्याने घराबाहेर पडू नये. दोन चार जणांनी मोठ्याने गप्पा मारत जावे. रात्री घराबाहेर झोपू नये. परिसरात व घराबाहेर दिवे लावणे, शेतात जातांना हातात बॅटरी, काठी व मोठे आवाज करणारी साधने रेडिओ, मोबाईलवर संगीत ऐकणे याचा वापर करावा. वणवा लावू नका." - कैलास नागरगोजे, वनपरिक्षेत्र अधिकारी उंबरठाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.